धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:38 AM2019-05-03T11:38:22+5:302019-05-03T11:39:25+5:30

गेल्या पाच वर्षात कापसाचे क्षेत्र साडेनऊ हजार हेक्टरने वाढले

Farmers cultivate cotton in Dhule district tomorrow | धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल

धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल

Next
ठळक मुद्देजिल्हयात ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होतगेल्या पाच वर्षात कापूस लागवडीच्या क्षेत्रात वाढपाण्याअभावी हंगामपूर्व कापूस लागवड घटणार

आॅनलाइन लोकमत
धुळे : कापसावर पडत असलेली रोगराई, पाण्याची अनुपलब्धता, अपेक्षित भाव मिळत नसला तरी शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडेच आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात कापूस लागवडीच्या क्षेत्रात ९५०० हेक्टर क्षेत्रात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर सोयाबीन, मका लागवडीचे प्रमाण वाढलेले आहे. तर पाण्याची कमतरता असल्याने, उसाचे क्षेत्र कमी झालेले आहे.
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५६६.३० मिलीमीटर एवढे आहे. जिल्हयात ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होत असते.मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून पावसाची अनियमितता आहे. त्यामुळे शेतकºयांनीही पारंपारिक पीके न घेता, कमी पाण्यात, कमी कालावधीत व जास्त उत्पादन देणाºया पिकांची लागवडीला सर्वात जास्त प्राधान्य देण्यास सुरवात केली आहे.
शेतकºयांचे पांढरे सोने समजले जाणाºया कापूस लागवडीकडे शेतकºयांचा सर्वात जास्त कल असतो. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात कापूस लागवडीच्या क्षेत्रातही वाढ झालेली दिसून येते. २०१५-१६ मध्ये १ लाख ८८ हजार हेक्टर ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. तर १६-१७ या वर्षात ७५०० हेक्टरने वाढ होत १ लाख ९६ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली. त्यानंतर १७-१८ या वर्षात ९४०० हेक्टरने वाढ होत आता २ लाख ५ हजार ३८३ हेक्टर पर्यंत लागवड करण्यात आली. तर २०१८-१९ मध्ये २ लाख ३२ हजार ७०० व १९-२० मध्येही एवढेच कपाशी लागवडीचे उद्दिष्ट आहे.
२०१७-१८ मध्ये कपाशीची २ लाख ५ हजार ३८३ पैकी तब्बल १ लाख ५३ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. तर गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले असे असतांनाही शेतकºयांचे खरीप हंगामात कापूस लागवडीला प्राधान्य असल्याचे दिसून येते.
त्याचबरोबर भाताची लागवडी वाढलेली आहे. २०१५-१६ मध्ये अवघ्या ४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर असलेली भात लागवड १८-१९ या वर्षासाठी ६ हजार हेक्टरवर करण्यात आली होती. तर गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने यावर्षी फक्त ४ हजार ९०० हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट प्रस्तावित केलेले आहे. दरम्यान यावर्षी असलेली पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता, हंगामपूर्व कपाशी लागवडीचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. मका लागवडीतून दुहेरी उत्पादन मिळते. मक्या बरोबरच चाराही विक्री होत असतो. त्यामुळे मका लागवडीकडेही कल वाढलेला आहे. त्याचबरोबर बाजरी, ज्वारी, यांचेही क्षेत्र वाढत चालेले आहे.

 

Web Title: Farmers cultivate cotton in Dhule district tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे