पिंपळनेरजवळ ओव्हरटेकच्या नादात तरुणाचा करुण मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:20 PM2018-08-16T22:20:55+5:302018-08-16T22:21:56+5:30

अपघात : मदतीसाठी अनेक जण धावले, पोलिसात गुन्ह्याची नोंद

Due to the overtake near Pimpalner, the death of the young man dies | पिंपळनेरजवळ ओव्हरटेकच्या नादात तरुणाचा करुण मृत्यू

पिंपळनेरजवळ ओव्हरटेकच्या नादात तरुणाचा करुण मृत्यू

Next
ठळक मुद्देपिंपळनेर सटाणा दरम्यान घडलीरक्ताच्या थारोळ्यात होता मृतदेहअनेक जण धावले मदतीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणाºया पिकअप व्हॅनवर धडकून दुचाकी चालक बसच्या चाकात आल्याने चिरडला गेल्याची दुर्देवी घटना पिंपळनेरनजिक घडली़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ 
साक्री तालुक्यातील सौंदाणे येथे राहणारा केशव काळू भारुडे (३०) हा तरुण बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जीजे ०५ एचएच ७३२१ या क्रमांकाच्या दुचाकीने पिंपळनेरहून सटाणाकडे जात असताना पोहा मिलच्या समोर त्याने पुढे चालणाºया एमएच २० बीएल ०९३६ या महामंडळाच्या बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला़ त्याची दुचाकी निम्मी बस ओलांडून पुढे गेली असता समोरुन एमएच ०३ एन ५५२२ या क्रमांकाची पिकअप व्हॅन आली़ समोरुन व्हॅन आल्याने गांगरलेल्या केशवला मोटारसायकल नियंत्रित करता न आल्याने तो पिकअप व्हॅनवर जावून धडकला़ वेगात असल्याने तो फेकला गेला़ त्याला जबर मार लागल्याने जागीच त्याचा अंत झाला़ 
याप्रकरणी पराग सुर्यवंशी यांनी पोलिसात माहिती दिली़ त्यानुसार अपघाताची नोंद करण्यात आली़ तसेच बेदरकारपणे वाहन चालवून स्वत:च्या मरणास कारणीभूत ठरला, म्हणून केशव भारुडे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला़ घटनेचा पुढील तपास सुरु आहे़ 

Web Title: Due to the overtake near Pimpalner, the death of the young man dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.