जिल्हाधिकारी राहूल रेखावार  : मतदार चिठ्ठी व्यतिरिक्त द्यावा लागणार ओळखपत्राचा पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:54 PM2019-04-20T12:54:31+5:302019-04-20T12:56:16+5:30

मतदारांना छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप

District Magistrate Rahul Chakraborty: Proof of identity card in addition to the voter list | जिल्हाधिकारी राहूल रेखावार  : मतदार चिठ्ठी व्यतिरिक्त द्यावा लागणार ओळखपत्राचा पुरावा

dhule

Next


धुळे : लोकसभा निवडणुकीसाठी  धुळे जिल्ह्यात २९  एप्रिल  रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांना मतदान केंद्रस्तरीय  अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र, मतदानासाठी केवळ मतदार चिठ्ठी ही मतदाराला ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर स्वीकारण्यात येणार नाही. यासोबत ओळख पटविण्यासाठी मतदारांनी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आणावे किंवा भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या ११ अतिरिक्त ओळखपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणावे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांनी कळविले आहे.
            जिल्हाधिकारी  रेखावार यांनी म्हटले आहे, छायाचित्र मतदार चिठ्ठींचे वाटप मतदारांना २४ एप्रिल  पर्यंत वाटप करण्यात येणार आहे. त्याचा दैनंदिन अहवाल केंद्रस्तरीय अधिकारी यांनी सादर करावयाचा आहे. छायाचित्र मतदार चिठ्ठीचे वाटप करतानांच ती मतदानासाठीचा पुरावा नसून मतदानासाठी येताना भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या ११ पुराव्यांपैकी एक पुरावा आणणे बंधनकारक असल्याचे मतदारांना  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सांगत आहेत.
सद्य:स्थितीत मतदारांना मोठ्या प्रमाणात छायाचित्रासह मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे.त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने आता केवळ छायाचित्रासह मतदार चिठ्ठी मतदाराचे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. 
 मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र  सादर करु शकणार नाहीत, अशा मतदारांना त्यांची स्वतंत्र ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढील नमूद कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत. 

Web Title: District Magistrate Rahul Chakraborty: Proof of identity card in addition to the voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे