धुळे जिल्हा परिषद बरखास्त करुन प्रशासक नेमावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:07 PM2018-12-26T12:07:22+5:302018-12-26T12:07:51+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्हा दौऱ्यावर

 Dismantling of Dhule Zilla Parishad and appointing Administrator - BJP District President Babanrao Chaudhary's demand for Chief Minister Devendra Fadnavis | धुळे जिल्हा परिषद बरखास्त करुन प्रशासक नेमावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांची मागणी

धुळे जिल्हा परिषद बरखास्त करुन प्रशासक नेमावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांची मागणी

Next

धुळे - धुळेजिल्हा परिषदेची मुदत ३१ डिसेंबरला समाप्त होत आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक होऊ शकत नाही. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत जिल्हा परिषद बरखास्त करुन प्रशासक नेमण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता जि.प. बरखास्त करुन प्रशासक नेमण्यात यावे अशा मागणीचे निवेदन गोंदूर विमानतळावर भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी भाजपा शेतकरी आघाडी उपाध्यक्ष बापु खलाणे, माजी जि.प. अध्यक्ष मनोहर भदाणे यांचा समवेत दिले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, धुळे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण झालेला असून जिल्हा परिषदेची निवडणुक लांबणीवर पडलेल्याने निवडणुका होईपावतो जिल्हा परिषद बरखास्त करुन याठिकाणी प्रशासकाची नेमणुक करावी. तसेच प्रशासक नेमणुक करुन ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मदत होईल.या जिल्हा परिषद सदस्यांचा पाच वर्षाचा कालावधी पुर्ण झालेला असुन जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला नाही. त्यामुळे ही जिल्हा परिषद बरखास्त करुन प्रशासक नेमण्यात यावे अशी मागणी जिल्हाच्यावतीने भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्यासह भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिंघवी, जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव, कामराज निकम, अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष जिजाबराव सोनवणे, धिरेंद्र सिसोदिया, सरलाबाई बोरसे, चंद्रजित पाटील, किशोर माळी, भाऊसाहेब देसले, प्रदिप कोठावदे, प्रा.अरविंद जाधव, देवेंद्र पाटील, मिलिंद पाटील, जिल्हा चिटणीस दरबारसिंग गिरासे, वैशाली महाजन, लिलाबाई सुर्यवंशी, सविता पगारे, शितल ठाकुर, चंद्रकांत पाटील, संजय आसापुरे, आशाबाई पाटील, सुशिलाबाई जमादार, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मोतीलाल पोतदार, जिल्हा कार्यालय प्रमुख रत्नाकर बैसाणे,साक्री तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, शिंदखेडा तालुकाध्यक्ष नथ्थु पाटील, धुळे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.राहुल पाटील, शिरपुर तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शिरपुर शहराध्यक्ष हेमंत पाटील, दोंडाईचा शहराध्यक्ष प्रविण महाजन, शिंदखेडा शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, पिंपळनेर शहराध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, साक्री शहराध्यक्ष महेंद्र देसले आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title:  Dismantling of Dhule Zilla Parishad and appointing Administrator - BJP District President Babanrao Chaudhary's demand for Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.