धुळे जिल्ह्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:00 PM2019-02-21T17:00:16+5:302019-02-21T17:01:46+5:30

जिल्ह्यात फक्त दहिवेल केंद्रावर चौघांना कॉपी करतांना पकडले

In the Dhule district, HSC examinations are going on smoothly | धुळे जिल्ह्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू

धुळे जिल्ह्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू

Next
ठळक मुद्देबारावीसाठी २५ हजार ३५७ विद्यार्थी प्रविष्ट पहिला पेपर सुरळीत पार पडलाभरारी पथकांनी ठिकठिकाणी दिल्या भेटी

आॅनलाइन लोकमत
धुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात
येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरूवारपासून प्रारंभ झाला. शहरीभागात अतिशय कडक वातावरणात पहिला पेपर पार पडला असला तरी, ग्रामीण भागात कॉपीचे तुरळक प्रकार घडले. दरम्यान परीक्षा केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. दरम्यान दहीवेल केंद्रावर चौघांना कॉपी करतांना पकडण्यात आले.
या परीक्षेसाठी जिल्ह्यात २५ हजार ३५७ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. ४४ केंद्रावर ही परीक्षा सुरू झालेली आहे. धुळे शहरातील सात केंद्रावर परीक्षा होत आहे.
आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. परीक्षा मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
सव्वादहा वाजेपासूनच गर्दी
बारावीचा पहिला पेपर असल्याने, सकाळी सव्वा दहावाजेपासूनच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली होती. केंद्रात आल्यावर आपला बैठक क्रमांक कुठे आहे, याचा शोध काही विद्यार्थी घेताना दिसून येत होते.
परीक्षार्थींना केंद्रापर्यंत सोडण्यासाठी काहींचे पालक, मित्र आल्याने, केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर वाहतुकीची कोंडी झालेली होती.
यावेळी परीक्षा केंद्रात १०.५० वाजताच विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्न पत्रिका मिळाली. त्यामुळे दहा मिनीटे विद्यार्थ्यांना पेपर अवलोकन करण्यास अवधी मिळाला.दरम्यान परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसमक्षत प्रश्नपत्रिकेचे पाकीट उघडण्यात आले.
कॉपीचे तुरळक प्रकार
सर्वच परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. ११ वाजेनंतर केंद्राचे मुख्य प्रवेशद्वारच बंद करण्यात आल्याने, कोणालाही आत जाणे शक्य होत नव्हते. पोलीस तैनात असल्याने, बाहेरून कॉपी देण्याच्या प्रकारालाही चांगल्यापैकी आळा बसला होता. ग्रामीण भागात मात्र तुरळक प्रमाणात कॉपीचे प्रकार घडले आहेत.
 

Web Title: In the Dhule district, HSC examinations are going on smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.