साहूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह धुळ्यात आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 03:52 PM2019-07-04T15:52:51+5:302019-07-04T15:53:00+5:30

आक्रमकता : साहुरचे ग्रामस्थांनी मांडला होता ठिय्या

The dead body of Sahur's students was brought to Dhule | साहूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह धुळ्यात आणला

साहूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह धुळ्यात आणला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील साहूर येथील पाचवीचा विद्यार्थी दर्शन कोळी याचा गुरुवारी सकाळी रिक्षातून पडून मृत्यू ओढवला़ पालकांनी त्याचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला होता़ साहूर गावात बस येत नाही, विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने शाळेत जावे लागते़ बस सुरु नसल्यानेच मुलाचा बळी गेल्याची भावना पालकांनी व्यक्त केली़ शानाभाऊ सोनवणे यांच्यासह संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत प्रशासनाकडे मागण्यांचा पाठपुरावा केला़ त्यात मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करणे, जिल्हाधिकारी, तहसीलदार, राज्य परिवहन महामंडळ आणि शाळा व्यवस्थापनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशा काही मागण्या यावेळी सादर करण्यात आल्या होत्या़ निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली़ चर्चेअंती ग्रामस्थांनी मृतदेह उचलला़ यावेळी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता़ 

Web Title: The dead body of Sahur's students was brought to Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे