नियम मोडणाºया वाहनचालकांना ‘खाकी’चा हिसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:24 PM2018-02-15T15:24:32+5:302018-02-15T15:25:21+5:30

धुळे शहर वाहतूक शाखा : वर्षभरात ५२४ वाहनचालकांवर कारवाई, ७४ हजारांचा दंड वसूल 

Dash of 'Khaki' to drivers who break the rule | नियम मोडणाºया वाहनचालकांना ‘खाकी’चा हिसका

नियम मोडणाºया वाहनचालकांना ‘खाकी’चा हिसका

Next
ठळक मुद्देआता विनागिअरच्या दुचाकींचे प्रमाण सध्या वाढल्याने केवळ अ‍ॅक्सिलेटरवर हात ठेवला तरी दुचाकी चालविता येत असल्याने डाव्या हातात मोबाइल पकडून दुचाकी चालवत बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ या वाहनचालकांचे अर्धे लक्ष मोबाइलवर व्यक्ती काय बोलतेय याकडे असतेविनागिअरची दुचाकी चालविणारे काही वाहनचालक वाहन चालवित असताना सोशल मीडियावरचे संदेश वाचत असतात़ हे संदेश वाचताना त्यांचे वाहनावरील संपूर्ण दुर्लक्ष होते़ त्यामुळे अचानक कोणी वाहनासमोर आल्यास अपघाताची दाट शक्यता असते. धुळे शहर वाहतूक शाखेने फेबु्रवारी २०१७ मध्ये शहरात मोबाइलवर बोलणाºया वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या महिन्यात २७२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. 

देवेंद्र पाठक । 
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ गेल्या वर्षभरात ५२४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली़ त्यांच्याकडून तब्बल ७४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला़ 
मोबाइल हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे़ आपल्यापासून तो एक क्षणही दूर असू नये, जर तो दूर झाला तर आपण जगात मागे पडू अशी भावना तरुणाईमध्ये निर्माण होत आहे़ वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असते़ असे असलेतरी वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºया ५२४ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली़ त्यांच्याकडून तब्बल ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ 
मोबाइल हा आता केवळ ‘फॅशन’पुरता राहिला नसून ती मूलभूत गरज झालेली आहे़ असे असलेतरी आपल्या जीवापेक्षा ते कधीही महत्त्वाचे नसते़ पण, ही बाब कोणीही लक्षात घेत नाही हे दुर्दैव आहे़ विशेषत: मोटारसायकल चालविताना बोलणारे तर त्यात आघाडीवरच असतात़ अनेक मोटारचालक ‘हॅण्डस् फ्री’ सिस्टिम घेतात़ तर काही जण स्टेअरिंगसमोरच मोबाइल स्टॅण्ड लावून ठेवतात़ कॉल आला की स्पिकर आॅन करून चालत्या गाडीवरच बोलताना दिसतात़ त्यांचे अर्धे लक्ष मोबाइलकडे आणि अर्धे लक्ष समोर असते़ त्यात गाडी वेगात असली तर अपघाताचा धोका आणखीनच वाढतो़ गेल्या वर्षभरात वाहनचालकांवर कारवाई करूनही  वाहनचालकांना शिस्त लागलेली नाही. शहरातील वर्दळीच्या  जागी नागरिक त्यांची वाहने कुठेही उभी करतात. परिणामी, वाहतूक पोलीस कोंडी होते. त्याचा फटका स्थानिक व्यावसायिक व वाहनचालकांना बसतो. त्यासाठी वाहतूक पोलिसांची वर्दळीच्या रस्त्यावर गस्त वाढविणे आवश्यक असून शिस्त लागण्यासाठी पोलिसांनी त्यांचा ‘वचक’ निर्माण करायला हवा, असा सूर व्यक्त होत आहे. 

मोबाइल हातात धरून कोणीही वाहन चालवू नये़ याबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येत असते़ असे कोणी वाहनधारक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते़ दंड करणे हा आमचा उद्देश नसून वाहन चालविताना स्वत:ची आणि दुसºयाची काळजी घेणे हा आहे़ असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश मुंढे यांनी सांगितले़ 

Web Title: Dash of 'Khaki' to drivers who break the rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.