धुळ्यात मजुरीच्या वादातून ठेकेदाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:43 PM2017-10-29T12:43:09+5:302017-10-29T12:44:01+5:30

लाकडी बॅटचा वापर : हाणामारीत आरोपीसह अन्य एकजण जखमी

Contractor's blood in the case of wages in the Dhule | धुळ्यात मजुरीच्या वादातून ठेकेदाराचा खून

धुळ्यात मजुरीच्या वादातून ठेकेदाराचा खून

Next
ठळक मुद्देआतिषकुमार सैनी याच्याकडे राहूलकुमार दिवाकर याने मजुरीचे पैसे मागितलेपैशाच्या वादातून त्यांच्यात वाद झालामारहाणीत आरोपीसह अन्यएकजण जखमी


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मजुरीच्या पैशांची वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष करणाºया ठेकेदाराचा खून मजुराने केल्याची घटना शहरातील चाळीसगाव रोड परिसरात शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान हाणामारीत आरोपीसह अन्य एकजण जखमी झालेला आहे. 
चाळीसगाव रोड परिसरातील बोरसे नगर भागात राहणारे रोशन हाजी पिंजारी यांच्या मालकीचे परवीन कॉटन वेस्ट नावाची फॅक्टरी आहे़  या फॅक्टरीचा  ठेकेदार आतिषकुमार शांतारामसिंग सैनी (२३) यांच्याकडे राहूलकुमार दिवाकर हा मजुरीचे पैसे मागत असताना वाद निर्माण झाला़ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. राहूलकुमारने आतिषकुमार सैनी याला  लाकडी बॅटने मारहाण केली. यात आतिषकुमारच्या  डोक्याला, पायाला आणि हाताला जबर मार बसून गंभीर दुखापत झाल्याने, त्याचा   मृत्यू झाला. तर राकेशकुमार शांतारामसिंग सैनी यास गंभीर दुखापत झाली असून  त्याच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत़ या मारहाणीत  आरोपी राहुलकुमार  दिवाकर हा देखील जखमी असून पोलिसांच्या देखरेखीखाली रूग्णालयात उपचार घेत आहे. 
शनिवारी रात्री साडेअकरा वाजता लोकेशकुमार प्रकाशसिंग जाटब यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ याप्रकरणी राहुलकुमार ध्यानसिंग दिवाकर (रा़ खेडा अपलोरा, उत्तरप्रदेश) याच्याविरुध्द भादंवि कलम ३०२, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़ 


 

Web Title: Contractor's blood in the case of wages in the Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.