स्वच्छता ‘अ‍ॅप’मध्ये धुळे मनपा राज्यात दुस-यास्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:44 AM2017-12-13T11:44:06+5:302017-12-13T11:45:03+5:30

‘रँकींग’मध्ये यश : देशात २० वा क्रमांक

Cleanliness 'app' in Dhule municipal state | स्वच्छता ‘अ‍ॅप’मध्ये धुळे मनपा राज्यात दुस-यास्थानी

स्वच्छता ‘अ‍ॅप’मध्ये धुळे मनपा राज्यात दुस-यास्थानी

Next
ठळक मुद्देआतापर्यंत सुमारे ९ हजार नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड केले आहे़ शिवाय अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची तत्काळ सोडवणूकही करण्यात आली आहे़.दरम्यान, मनपा सद्यस्थितीत देशात २० व्या स्थानावर तर राज्यात दुसºया स्थानावर आहे़ मनपाला स्वच्छ सर्वेक्षणातील गुणांकनात अव्वल मानांकन मिळावे, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  :  स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी मनपाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे़ मनपाने स्वच्छ सर्वेक्षणाला प्रत्यक्ष सुरूवात होण्यापूर्वीच स्वच्छता अ‍ॅपच्या रँकिंगमध्ये देशात २० वा तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे़
मनपातर्फे ७ नोव्हेंबरपासून स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या़ मनपाने कचराकुंड्यांचे सर्वेक्षण करण्यासह घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविण्याची कार्यवाही केली़ त्याबाबत कचरा संकलन करणाºया ठेकेदारांची बैठक घेण्यात आली़ शिवाय शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्यांनिहाय कार्यवाही करण्यात येत आहे़ स्वच्छ सर्वेक्षणाचाच भाग असलेल्या स्वच्छता अ‍ॅपसाठी मनपाला जनजागृती करून ७ हजार अ‍ॅपचे लक्ष्य देण्यात आले होते़ ते मनपाने पूर्ण केले आहे. 

Web Title: Cleanliness 'app' in Dhule municipal state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.