पावसापासून केकला वाचविण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 04:54 PM2019-04-15T16:54:38+5:302019-04-15T16:58:36+5:30

दक्ष पत्रकार संघाच्यावतीने ५२८ किलो वजनाचा केक 

Challenge to save Kake from rain | पावसापासून केकला वाचविण्याची धडपड

dhule

Next

धुळे : डॉ़ बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीचे औचित्यसाधून दक्ष पत्रकार संघाच्यावतीने ५२८ किलो वजनाचा केक आंबेडकर अनुयायी यांच्या उपस्थितीत कापण्यात आला़ जल्लोष कायम असताना अचानक पाऊस आला़ तरीही जल्लोष कमी न होता या केकला पावसांपासून वाचविण्यात आले़ उत्साहपूर्ण वातावरणात डॉ़ बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला़ 
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच आनंदाचे वातावरण होते़ बसस्थानकानजिक असलेल्या डॉ़ बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले़ याशिवाय शासकीय, निमशासकीय कार्यालयात आणि ठिकठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला़ दरवर्षी केक कापून जल्लोष केला जातो़ यंदाच्यावर्षी ५२८ किलो वजनाचा केक आणण्यात आला होता़ शहरातील जिल्हा कारागृहाजवळ तो कापून त्याचे वाटप करण्यात आले़ हा कार्यक्रम सुरु असताना अचानक बेमोसमी पावसाने हजेरी लावली़ क्षणार्धात उपस्थित असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या केकचे संरक्षण केले़ केकला पाणी लागू दिले नाही़ काही क्षणानंतर पाऊस गेला आणि पुन्हा जल्लोषात केकचे वितरण करण्यात आले़ या केकचा अनेकांनी लाभ घेतला़ 
दरम्यान, पाऊस असूनही सायंकाळी उशिरापर्यंत नागरीकांमध्ये जल्लोष कायम होता़ 

Web Title: Challenge to save Kake from rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे