पारोळाचे माजी नगराध्यक्षांच्या कारच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:50 PM2018-12-07T23:50:35+5:302018-12-08T00:06:47+5:30

जयहिंद चौकातील घटना : गाडीत पैसे असल्याच्या संशयावरुन लोकसंग्रामच्या कार्यकत्यांकडून दगडफेक

The car of former president of Parola was burnt in the car | पारोळाचे माजी नगराध्यक्षांच्या कारच्या काचा फोडल्या

पारोळाचे माजी नगराध्यक्षांच्या कारच्या काचा फोडल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील जयहिंद चौकात रात्री आठ वाजेच्या सुमारास जळगावकडून येणाºया गाडीत पैसे असल्याचा संशय आल्याने लोकसंग्रामचे प्रभाग पाचमधील उमेदवार व माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवून  दगडफेक करुन गाडीचे नुकसान केले. ती गाडी पारोळाचे माजी नगराध्यक्ष आणि भाजयुमोचे शहराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरुडे यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दगडफेक प्रकरणी अटक झालेल्या लोकसंग्रामचे दिलीप साळुंखे यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी आमदार अनिल गोटे यांनी देवपूर पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन केले. राष्टÑवादीचे माजी स्थायी समिती सभापती कैलास चौधरी हे सुद्धा त्याठिकाणी आंदोलनात सहभागी झाले. शेवटी शिरुडे यांनी फिर्याद मागे घेतल्याने साळुंखेची सुटका झाली आणि दोन तासांपासून सुरु असलेल्या नाट्यावर पडदा पडला. 
शहरातील जयहिंद चौकात रात्री आठ वाजेच्या सुमारास लोकसंग्रामचे प्रभाग पाचमधील उमेदवार व माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंखे आपल्या कार्यकर्त्यांसह उभे असतांना त्यांना एमएच १९ सीएफ १६१६ क्रमांकाची कार येतांना दिसली. जळगाव पासिंगची कार असल्याने त्यात पैसे असल्याचे संशय आल्याने त्यांनी कार थांबविली. कारमधील लोकांची विचारपूस सुरु केली असता कारमध्ये बसलेले दोन जण हे गाडीतून उतरुन पळाले. त्यामुळे अधिक संशय आल्याने लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केली. त्यात गाडीच्या काचा फुटल्या. ती कार पारोळाचे माजी नगराध्यक्ष आणि भाजयुमोचे शहराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरुडे यांची होती आणि ते स्वत: गाडीत होते. हा सर्वप्रकार घडत असतांना त्याठिकाणी गर्दी झाली. तेव्हा देवपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दगडफेक करुन कारच्या काचा फोडल्याप्रकरणी दिलीप साळुंके यांना अटक करुन देवपूर पोलीस स्टेशनला आणले. ही घटना आमदार अनिल गोटे यांना कळाल्यानंतर ते तातडीने पोलीस स्टेशनला दाखल झाले. 
आमदारांचा ठिय्या
घटनेची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आमदार गोटे यांनी पोलीस अधिकारी यांना गाडीतून पळून गेलेले दोन जणांना अटक करा, अन्यथा दिलीप साळुंखे यांना सोडा. तसे करणार नसलातर मलाही अटक करा असा पावित्रा घेत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. यावेळी डीवायएसपी सचिन हिरे, धुळे शहरचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, देवपूरचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी आमदार गोटे यांच्याशी चर्चा केली. त्यांना यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. 
परंतु आमदारांनी  कारमधील पळालेल्या अन्य दोन जणांना अटक करा़ अन्यथा मला अटक करा, असे सांगून तेथून जाण्यास इन्कार केला. हे नाट्य घडत असतांना पोलीस दिलीप साळुंखे यांना जिल्हा रुग्णालयात मेडिकल चेकअपसाठी घेऊन गेले़ दरम्यान, कारच्या काच फुटल्याने पारोळाचे माजी नगराध्यक्ष शिरुडे यांना दिलीप साळुंखे यांच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस दबाव आणत असल्याचा आरोप आमदारांनी केला.
राष्टÑवादीचे कैलास चौधरींची पोलीस स्टेशनला एन्ट्री
आमदाराचे ठिय्या आंदोलन सुरु असतांनाच त्याला पाठिंबा देण्यासाठी राष्टÑवादीचे माजी स्थायी समिती सभापती व प्रभाग चारमधील राष्टÑवादीचे उमेदवार कैलास चौधरी आपल्या समर्थकांसह त्याठिकाणी पोहचले. त्यांनीही आमदारांसोबत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरु केले. तसेच याप्रकरणी कारमधून पळालेल्या दोन जणांना अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्हालाही अटक करा, असा पावित्रा घेतला.
गर्दी वाढली
हा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये सुरु असतांना बाहेर गर्दी वाढत होती. लोकांची वाढती गर्दी आणि आतील आंदोलन यामुळे पोलीस अधिकारी आमदार गोटे यांच्याकडे आग्रह करु लागले. हे नाट्य सुरु असतांना दिलीप साळुंखे यांच्याविरोधात फिर्याद देणारे पारोळाचे गोविंद शिरुडे यांनी आपण आपली फिर्याद मागे घेतो, असे सांगितले. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी सुटकेचा श्वास घेतला. फिर्याद मागे घेतल्यामुळे दिलीप साळुंखे यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना सोडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.
पोलीस अधिकारी यांनी आमदार अनिल गोटे यांना ही माहिती दिली. तसेच वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलेल्या दिलीप साळुंखे यांना सोडण्यात येईल असे सांगितले. तेव्हा  आमदार अनिल गोटे यांनी आंदोलन मागे घेऊन पोलीस स्टेशनमधून बाहेर आले.  बाहेर  उपस्थित नागरिकांचे आभार मानले. व घटनेची माहिती दिल्यानंतर तेथून निघाले.   त्यामुळे  दोन तासानंतर नाटयावर  पडदा पडला.

Web Title: The car of former president of Parola was burnt in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे