हलाखीमुळेच मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:11 PM2019-04-25T23:11:57+5:302019-04-25T23:12:20+5:30

आक्रमक पवित्रा : शाळा नंबर १ येथील २५ दुकानदार करताहेत आश्वासनपूर्तीची प्रतीक्षा

Boycott voting due to havoc | हलाखीमुळेच मतदानावर बहिष्कार

हलाखीमुळेच मतदानावर बहिष्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेच्या शाळा क्रमांक १ समोर नोटीस न देता फर्निचरसह दुकाने उदध्वस्त करण्यात आली़ याला तब्बल गुरुवारी वर्ष पूर्ण झाले़ अद्याप आमचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही़ त्यामुळे प्रशासनाला निवेदन सादर करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे़ 
मनपा प्रशासनाला निवेदन देताना तुलसी रिजवानी, रमेश बोथरा, सुनील चौधरी, संजय राजाणी, राम खेमाणी, महेश मोटवाणी, रितेश मंदाण, कमल कुंड, दीपक कटारिया आदींची उपस्थिती होती़ 
दुकाने उदध्वस्त केल्यामुळे लहान दुकानदारांना रोडावर बसण्यासाठी जागा नाही़ टपरी ठेवण्यासाठी सहकार्य मिळत नाही़ परिणामी व्यवसाय संसार करणे कठीण झाले आहे़ मनपा शेजारी शासकीय जागेवर कॉम्प्लेक्स मंजूर केले असल्याचे आश्वासन महापौर यांनी दिले होते़ परंतु आता १ वर्ष होऊनही हा प्रश्न निकाली निघालेला नाही़ त्यामुळे दुकानदारांनी आंदोलन छेडले़ 

Web Title: Boycott voting due to havoc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे