दहीवेलनजीक महामार्गावर सुरक्षारक्षकाचा निर्घृण खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 04:29 PM2017-12-20T16:29:52+5:302017-12-20T16:31:07+5:30

घटनास्थळी काहीही चोरीस न गेल्याने कारण गुलदस्त्यात

The bloodless security guards on the Dahiwalangi highway | दहीवेलनजीक महामार्गावर सुरक्षारक्षकाचा निर्घृण खून 

दहीवेलनजीक महामार्गावर सुरक्षारक्षकाचा निर्घृण खून 

Next
ठळक मुद्देखूनासाठी तीक्ष्ण हत्याराचा वापर उभ्या ट्रकपासून मृतदेह ५० फुटावर सापडलाघटनास्थळी काहीही चोरीस न गेल्याने कारण गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
दहीवेल, ता. साक्री : दहीवेल-नंदुरबार रस्त्यावर दहीवेल चौफुलीपासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावरील व्यापारी शेडच्या परिसरात तेथील सुरक्षारक्षकाचा (वॉचमन) तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून निर्घृण खून केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भिवाजी गोपाळ देसाई (वय  ५४, रा.डाबरीपाडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 
दहीवेल येथील मक्याचे व्यापारी कैलास वसंतराव चौधरी यांचे दहीवेल-नंदुरबार रस्त्यालगत शेड आहे. तेथे रात्रपाळीसाठी सुरक्षारक्षक म्हणून भिवाजी देसाई काम करत होते. मंगळवारी रात्री ते नेहमीप्रमाणे ड्यूटी बजावण्यासाठी आलेले होते. रात्री  कैलास चौधरी यांच्या मालकीच्या असलेल्या उभ्या ट्रक (क्र.एमएच १८- एम १२३९)च्या कॅबिनमध्ये ते झोपले होते. मात्र देसाई यांचा रात्री तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून खून करण्यात आलो. त्यांच्या अंगावरील कपडे फाटले असून बाजूला पडले होते. तर  काही अंतरावर झटापट झाल्याच्या खुणाही दिसून आल्या. त्यांच्या शरीरावर जखमाही दिसत आहेत. ट्रकच्या पुढील काचेला तडा गेला असून त्यांचा मोबाईल ट्रकच्या मागे असलेल्या मक्यावर पडलेला सापडला. तर देसाई यांचा मृतदेह ट्रकपासून अंदाजे ५० फूट अंतरावर आढळला आहे. दरम्यान घटनास्थळावरून प्र्रथमदर्शनी काहीही चोरीस गेलेले नाही. त्यामुळे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. बुधवारी सकाळी घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दहीवेल दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल वसावे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील तत्काळ घटनास्थळी पोहचले होते. त्यानंतर साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.एस. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक पवार हेही घटनास्थळी आले. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. तपासासाठी माहिती घेण्याचे कामही सुरू होते. देसाई यांचा मुलगा योगेश याने दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: The bloodless security guards on the Dahiwalangi highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.