‘बायोमेट्रीक’वरुन पुन्हा हजेरीपत्रकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:55 PM2019-03-28T22:55:59+5:302019-03-28T22:56:20+5:30

महापालिका : सफाई कामगारांच्या दैनंदिन हजेरीचा प्रश्न, अखेर पूर्वीच्या पद्धतीचा अवलंब 

Again, from the 'Biometric' letter | ‘बायोमेट्रीक’वरुन पुन्हा हजेरीपत्रकावर

‘बायोमेट्रीक’वरुन पुन्हा हजेरीपत्रकावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेतील स्वच्छता कर्मचाºयांना बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी लावावी लागत होती़ यामुळे कामचुकार कर्मचाºयांवर आळा बसविण्यात प्रशासनाला यश आलेले होते़ महापालिका प्रशासनाकडून अंमलबजावणी सुरु असताना मात्र थंबमशिन बंद पडल्याने ते दुरुस्त करण्याऐवजी पूर्वीप्रमाणेच हजेरी घेण्याचे काम सध्या केले जात असल्याचे समोर आले़ परिणामी बायोमेट्रीकवरुन हजेरी पत्रकाकडे ही वाटचाल सुरु झाली आहे़ 
१५ मशिन होते कार्यान्वित
महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाºयांसह सफाई कामगारांना यापुढे बायोमेट्रिक पध्दतीने दैनंदिन हजेरी लावावी लागत असताना संबंधित भागातील अधिकाºयांना देखील बायोमेट्रिक मशिन्सवर हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले होते़ त्यामुळे कामचुकार कर्मचाºयांना चाप बसण्यास सुरुवात झालेली होती़ हजेरीसाठी शहरातील विविध भागात जवळपास एकूण १५ मशिन्स कार्यान्वित करण्यात आले होते़ 
सर्वकाही गुणांसाठीच
महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणांतर्गंत स्वच्छतेविषयक २ हजार गुणांसाठी काही निकष पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे़ त्यात मुख्य कार्यालय पातळीवर कर्मचाºयांची हजेरी हा देखील भाग होता़ महापालिकेच्या स्वच्छता विभागातील सफाई कामगारांची संख्या सुमारे ७५८ इतकी आहे़ या सर्व कामगारांची बायोमेट्रीक हजेरी सुरु करण्यात आली होती़ त्यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षकाकडेच  थम्ब मशिन उपलब्ध करुन देण्यात आले होते़  
यापुर्वीही होता उपक्रम
यापूर्वीही सन २०१२ मध्ये मनपा प्रशासनाने स्वच्छता कामगारांची बायोमेट्रीक हजेरी सुरु केली होती़ मात्र, यंत्रातच बिघाड झाल्याने बायोमॅट्रीक हजेरी बंद होती़ 
स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुन्हा बायामेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली होती़ परिणामी पहाटेच कर्मचाºयांना थम्ब लावावे लागत होते़ पण, गेल्या किती तरी महिन्यांपासून थम्ब मशिनच बंद असल्याने हजेरी पत्रकावर हजेरी घेण्याची वेळ आली आहे़ 
शहरातील १० स्वच्छता निरीक्षकांवर हजेरी घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ त्यांच्या उपस्थितीवरुन त्यांना मानधनही वितरीत केले जात आहे़ 
कामचुकारांना बसला होता आळा
महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या स्वच्छता विभागातील कर्मचाºयांची हजेरी ही रजिस्टरवर होत होती़ पहाटे आणि सकाळी ९ वाजेच्या सुमारास दोनवेळा हजेरी लावणे त्यांना बंधनकारक करण्यात आले होते़ हजेरी लावण्यासाठी कर्मचारी येईलच याची काही शाश्वती राहत नव्हती़ कोणाचेही बंधन तसे नव्हते़ यामुळे अपेक्षित स्वच्छता होत नव्हती़ वारंवार सूचना देवूनही फारसा उपयोग होत नसल्यामुळे यावर प्रभावी उपाय म्हणून थम्ब मशिन लावण्यात आले होते़ त्यामुळे त्याचा परिणाम होण्यास सुरुवात झाला आणि नियमित थम्ब मशिनचा उपयोग होत असल्याचे मनपा सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले़ यातील हजेरीनुसार संबंधित कर्मचाºयांना मानधन दिले जात होते़ साहजिकच कामचुकारांना प्रशासकीय पातळीवरुन आळा बसविण्यात यश आले होते़ पण, हेच मशिन आता धुळखात पडले आहे़ 
स्वच्छतेची आधुनिक जनजागृती
नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवत असताना महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे वेळोवेळी आवाहन आरोग्य विभागाकडून होत असते़ त्यात स्वच्छता अ‍ॅपसह जनजागृतीचे विविध पर्याय देखिल उपयोगात आणले जात आहेत़ प्रशासनाकडून एक पाऊल टाकले जात असताना आता नागरिकांनी देखिल पुढे येण्याची गरज आहे़
दरम्यान, तांत्रिक अडचणीमुळे थम्ब मशीन बंद पडले आहेत़ परिणामी स्वच्छता कर्मचाºयांची हजेरी बायोमेट्रीक पध्दतीने हजेरीचे काम बंद असलेतरी पुर्वी प्रमाणेच हजेरी पत्रकावर स्वच्छता कर्मचाºयांची दैनंदिन हजेरी घेतली जात आहे़ त्याची जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांवर सोपविण्यात आलेली आहे़ थम्ब मशिन नव्याने मागविण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरुन सुरु असल्याचे सहायक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ 

Web Title: Again, from the 'Biometric' letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे