दिव्यांगांसोबत गैरवर्तन; वाहकावर कारवाईची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 02:14 PM2019-05-19T14:14:30+5:302019-05-19T14:15:57+5:30

विभाग नियंत्रकास निवेदन। प्रहार अपंग क्रांती संघटनेची मागणी 

Abuse with Divya; Demand for action on the carrier | दिव्यांगांसोबत गैरवर्तन; वाहकावर कारवाईची मागणी 

dhule

Next

धुळे : एसटी महामंडळाचे काही चालक व वाहक बहुतांश वेळेस प्रवासादरम्यान दिव्यांगाशी गैरवर्तन करतात. काही वाहक दिव्यांगांना सवलत देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे दिव्यांगांना चुकीची वागणूक देणाºया एसटी महामंडळाच्या चालक व वाहकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यावेळी प्रशासन निवेदन देण्यात आले़
एक तरुण दिव्यांग स्क्रिझोफेनिया आजाराने ग्रस्त आहे. संबंधित व्यक्ती नंदुरबार येथे उपचारासाठी जाण्याकरिता दोंडाईचा ते नंदुरबारमध्ये( एम.एच.४० एन.९०७१) बसमधून प्रवास करत होती. या बसचे वाहक रत्नाकर बागुल यांनी दिव्यांग व्यक्तीला सवलत देण्यास नकार दिला. तसेच दिव्यांग व त्याच्या सोबत असलेल्या मदतनीसाला सर्वासमोर अपमानास्पद वागणूक दिली. संबंधित दिव्यांग व्यक्तीकडे ५५ टक्के दिव्यांग असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र होते. त्यामुळे या व्यक्तीला ७५ टक्के व त्याच्यासोबत असलेल्या मदतनीसाला प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत देणे अपेक्षित होते. वाहकाने सवलत देण्यास टाळाटाळ केली.  याप्रकरणी संबंधित वाहकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. कविता पवार, इंदुबाई क्षीरसागर, शशिकांत सूर्यवंशी, संजय सोनवणे, रामलाल जैन यांनी केली़ 

शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तीं प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली असतांना देखील वाहकाकडून त्रास दिला जातो़

Web Title: Abuse with Divya; Demand for action on the carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे