जिल्ह्यातील फरार ३८ आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:47 PM2018-08-18T22:47:40+5:302018-08-18T22:48:43+5:30

पोलीस प्रशासन : पोलीस अधीक्षक यांची माहिती

38 absconding absconding accused in the district | जिल्ह्यातील फरार ३८ आरोपी ताब्यात

जिल्ह्यातील फरार ३८ आरोपी ताब्यात

Next
ठळक मुद्देपोलिसांची जिल्ह्यात दोन दिवसांची विशेष मोहीमगुन्हेगारांवर निर्माण होणार वचक

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : फरार आरोपींसह समन्स वॉरंट बजाविण्याची विशेष मोहीम जिल्हास्तरावर राबविण्यात येत आहे़ त्यात दोन दिवसात ३८ फरार आरोपींना पकडण्यात यश आले़ 
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या आदेशाने जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली़ त्यात ४२५ फरार आरोपींपैकी ३८ जणांना पकडण्यात आले़ याशिवाय समन्स वॉरंट मोहिमेत १ हजार १२९ पैकी ५२० समन्स, २७९ पैकी ८४ जामीनपात्र आणि ६६५ पैकी ११८ अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे़ तसेच अवैध धंदे करणारे आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाºयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले़

Web Title: 38 absconding absconding accused in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.