वाहनधारकांना ३ दिवसांचा ‘अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:58 PM2019-03-28T22:58:00+5:302019-03-28T22:58:22+5:30

धुळे शहर वाहतूक शाखा : फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश हॉर्न तात्काळ बदला

3 days of 'ultimatum' to the drivers | वाहनधारकांना ३ दिवसांचा ‘अल्टिमेटम’

वाहनधारकांना ३ दिवसांचा ‘अल्टिमेटम’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कर्कश हॉर्नसह फॅन्सी नंबर प्लेट वाहनधारकांनी तीन दिवसांच्या आत बदल करुन घ्यावेत़ यावर तातडीने अंमलबजावणी करावी़ अन्यथा, संबंधित वाहनधारकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल़ अशा इशारा शहर वाहतूक शाखेच्यावतीने पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे यांनी दिलेला आहे़ 
शहरासह जिल्ह्यातील बहुतेक बुलेट मोटारसायकलीच्या चालक आणि मालकांनी सायलन्सरमध्ये बदल केलेले आढळून आलेले आहे़ याशिवाय काही मोटारसायकल चालकांनी वाहनावरील नंबरप्लेट या नियमानुसार न बसविता फॅन्सी पध्दतीने त्या बसविलेल्या आहेत़ पाहणी दरम्यान हा प्रकार समोर आलेला आहे़ फॅन्सी नंबर प्लेटमध्ये प्रामुख्याने बाबा, काका, मामा, दादा वगैरे यांचा समावेश आहे़ 
या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेच्यावतीने अशा वाहनधारकांना सुचित करत तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत़ ज्यांनी आपल्या मोटारसायकलला फॅन्सी पध्दतीने नंबर प्लेट बसविलेल्या असतील किंवा मोटारसायकलीच्या हॅण्डलला, सायलन्सरमध्ये अवैधरित्या बदल केलेला असेल अशा मोटारसायकल चालकांवर शहर वाहतूक शाखेमार्फत सक्तीने कारवाई करण्यात येणार आहे़ 
फॅन्सी नंबर प्लेटसाठी १ हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे़ तसेच मोटारसायकलीच्या सायलेन्सरमध्ये अथवा हॅण्डलमध्ये बदल केल्यास २ हजार २०० रुपये पर्यंत दंडाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे़ त्याची काटेकोरपणे अंंमलबजावणी करण्यात येणार आहे़ या अनुषंगाने तीन दिवसांच्या आत वाहनांची नंबरप्लेट आणि सायलन्सर नियमानुसार करुन घ्यावे़  
अन्यथा होणार दंडात्मक कारवाई
संबंधित वाहनधारकांना तीन दिवस पुर्वीच सूचित करण्यात आलेले आहे़ त्याअनुषंगाने गांभिर्याने अंमलबजावणी करत वाहनाची फॅन्सी नंबर प्लेट बदलून घेणे आणि मोटारसायकलीचे सायलन्सर नियमाप्रमाणे बसवून घ्यावे़ अन्यथा, संबंधितांकडून दंड वसूल करण्यात येईल, अशी तंबी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिलेली आहे़ 

Web Title: 3 days of 'ultimatum' to the drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.