शिरपूर येथे ११११ लांबीचा तिरंगा रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 09:58 PM2019-02-19T21:58:24+5:302019-02-19T22:00:06+5:30

शहिद वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण

The 1111-long tri-color rallies at Shirpur | शिरपूर येथे ११११ लांबीचा तिरंगा रॅली

dhule

Next

शिरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने काश्मीरमधील पुलवामा येथे शहिद झालेल्या वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मिरवणूकीत तब्बल ११११ मीटर लांबीचा भव्य असा तिरंगा तयार करून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले़ १९ रोजी संध्याकाळी शहरातील पित्रेश्वर कॉलनीच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुर्णाकृती पुतळ्याला आमदार काशिराम पावरा यांनी मार्ल्यापण केले़ यावेळी उद्योगपती तपनभाई पटेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, राजू टेलर, नगरसेवक हेमंत पाटील, रोहित रंधे, राजूअण्णा गिरासे, चंदनसिंग राजपूत, किरण दलाल, अमृता महाजन, पोनि संजय सानप, माजी सैनिक शिरीष माळी, विश्वास जाधव तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते़
यानंतर शहिद झालेल्या वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मिरवणूकीत ११११ मीटर लांबीचा भव्य असा तिरंगा तयार करून तिरंगा रॅली काढण्यात आली़ रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांनी तिरंगा आपल्या हातात धरून सदर मिरवणूकीत हातभार लावून श्रद्धांजली अर्पण केली़ रॅलीचा समारोप शहिद स्मारकाजवळ करण्यात आला़

Web Title: The 1111-long tri-color rallies at Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे