दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून, कर्जत तालुक्यातील घटना  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 05:42 AM2019-05-06T05:42:35+5:302019-05-06T05:42:45+5:30

दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे घडली. पत्नीवर धारदार कोयत्याने वार करून पतीने जंगलात पलायन केले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Wife's murder, wife's murder, Karjat taluka incidents | दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून, कर्जत तालुक्यातील घटना  

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून, कर्जत तालुक्यातील घटना  

Next

नेरळ  - दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे घडली. पत्नीवर धारदार कोयत्याने वार करून पतीने जंगलात पलायन केले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ताडवाडी येथील लक्ष्मण दरवडा यांच्या बहिणीचे कळंबजवळील फोंडेवाडी येथील योगेश भला याच्यासोबत आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र योगेश बेरोजगार असल्याने नवरा-बायकोमध्ये सतत भांडणे होत. परिणामी योगेशची पत्नी भीमा दोन्ही मुलांना घेऊन चार महिन्यांपूर्वी आपल्या भावाकडे माहेरी ताडवाडी येथे राहण्यास गेल्या. त्यानंतर योगेशनेही सासरीच आपले बस्तान मांडले.

भीमा मोलमजुरी करून घर चालवायच्या, तर योगेश पत्नीला मारहाण करून दारुसाठी पैसे मागायचाया. रविवारी ५ मे रोजी ताडवाडी येथील घरी भीमा घरी एकट्याच असताना त्याचा फायदा घेऊन योगेशने पत्नीकडे दारूसाठी पैसे मागितले. त्या दोन दिवसांपासून कामावर गेल्या नसल्याने त्यांच्याकडे पैसे नव्हते. परिणामी त्यांच्यात वाद सुरू झाला. त्याच रागात योगेश याने भीमा यांच्या डोक्यात धारदार कोयत्याने वार केले आणि बोरगावच्या जंगलात पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भीमा यांचा काही वेळाने त्याच ठिकाणी झोपडीत मृत्यू झाला. या घटनेनंतर नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दोन पथकांकडून शोध सुरू
पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी यांनी जंगलात पळून गेलेल्या योगेशचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत. पोलीस उपनिरीक्षक सचिन सांगळे हे ताडवाडी येथे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Wife's murder, wife's murder, Karjat taluka incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.