Two motorcycle collisions; Death of a young man on the spot | दोन मोटारसायकलींची टक्कर; एका तरुणाचा जागीच मृत्यू  
दोन मोटारसायकलींची टक्कर; एका तरुणाचा जागीच मृत्यू  

पालघर - पालघर जिल्ह्यातील सफाळे – वरई मार्गावर दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होउन झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. अक्षय पाटील (वय 25) असं मृत तरुणाचे नाव असून तो गिराळे येथील रहिवासी होता. सफाळे – वरई मार्गावरील तांदुळवाडी घाटात काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

सफाळे येथून मोटारसायकलने घरी परतत असताना तांदुळ वाडी घाटातील नागमोडी वळणावर अक्षयच्या मोटारसायकलला विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलची जोरदार धडक बसल्याने अक्षय बसवर जाऊन आदळला. अपघातात अक्षयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  हा अपघात झाला तेव्हा अक्षयने हेल्मेट घातले नव्हते. तर त्याने  हेल्मेट घातले असते तर त्याचा प्राण वाचला असता अशी चर्चा सुरु आहे. 


Web Title: Two motorcycle collisions; Death of a young man on the spot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.