शनिवार पेठेतील २४ वर्षीय वैष्णवीचा संशयास्पद मृत्यू, अंगावर मारहाणीच्या खुणा, आई-भाऊ ताब्यात

By उद्धव गोडसे | Published: April 4, 2024 04:26 PM2024-04-04T16:26:07+5:302024-04-04T16:26:31+5:30

मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Suspicious death of 24-year-old Vaishnavi from Shaniwar Peth, marks of beating on her body, mother and brother in police custody | शनिवार पेठेतील २४ वर्षीय वैष्णवीचा संशयास्पद मृत्यू, अंगावर मारहाणीच्या खुणा, आई-भाऊ ताब्यात

शनिवार पेठेतील २४ वर्षीय वैष्णवीचा संशयास्पद मृत्यू, अंगावर मारहाणीच्या खुणा, आई-भाऊ ताब्यात

उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: शनिवार पेठेतील शनिवार पोस्ट ऑफिसजवळ राहणारी वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४) हिचा सीपीआरमध्ये उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ४) सकाळी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. तिच्या अंगावर मारहाण झाल्याच्या खुणा आहेत, त्यामुळे मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खासगी बँकेत नोकरी करणारी वैष्णवी पोवार ही आई आणि भाऊ यांच्यासोबत शनिवार पेठेतील घरात राहत होती. गुरुवारी सकाळी तिला नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत असल्याचे सीपीआरमधील डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून मृत वैष्णवी हिची आई शुभांगी लक्ष्मीकांत पोवार (वय ५०) आणि भाऊ या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. वैष्णवी हिला कोणी आणि कोणत्या कारणावरून मारहाण केली, ते अद्याप सष्ट झालेले नाही. लक्ष्मीपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Suspicious death of 24-year-old Vaishnavi from Shaniwar Peth, marks of beating on her body, mother and brother in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.