आलीशान कारमधून गुटख्याची तस्करी, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

By अनिल गवई | Published: December 7, 2022 01:15 PM2022-12-07T13:15:37+5:302022-12-07T13:16:19+5:30

खामगावात कारसह आठ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Smuggling of Gutkha from luxury cars, goods worth 8 lakhs seized in buldhana khamgaon | आलीशान कारमधून गुटख्याची तस्करी, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

आलीशान कारमधून गुटख्याची तस्करी, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

खामगाव: शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुमारे सव्वा लाख रुपयांच्या गुटख्याची तस्करी होत असल्याचे संशयीत वाहन शहर पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान आढळून आले. कारसह चालक फरार होण्याच्या बेतात असतानाच शहर पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कारसह सात लक्ष ७१ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल सिनेस्टाईल पध्दतीने पाठलाग करून पकडला. स्थानिक आठवडी बाजारात ही कारवाई सात डिसेंबरच्या रात्री साडेतीन वाजता दरम्यान करण्यात आली. यात कारचालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

खामगाव शहरातील आठवडी बाजारातून एका पांढºया रंगाच्या आलीशान कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात होती. त्याचवेळी शहर पोलीस स्टेशनचे एक पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना हे संशयीत वाहन दिसून आले. दरम्यान,   चालकाने पोलीसांना पाहून एक लक्ष १४ हजार ४४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा असलेले  वाहन चालकाने घटनास्थळावरून पळविण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी पाठलाग सुरूच ठेवल्याने ठराविक अंतरावर वाहन थांबवून चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलीसांनी प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यासह ६ लक्ष रुपयांची आलीशान कार आणि मोबाईल जप्त केला. एएसआय मोहन करूटले यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

फरार चालकाविरोधात गुन्हा

- पोलीस पाठलाग करीत असल्याचे निदर्शनास येताच, प्रतिबंधित गुटखा असलेल्या कार चालकाने पोलीसांनी त्याचे वाहन गाठण्यापूर्वीच एका ठिकाणी वाहन थांबविले. वाहन तसेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, वाहनातील मोेबाईल आणि अन्य पुराव्याच्या आधारे शहर पोलीसांनी खलील उल्ला खान रहेमत उल्ला खान रा. महेबूब नगर याच्या विरोधात भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Smuggling of Gutkha from luxury cars, goods worth 8 lakhs seized in buldhana khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.