Sidhu Moosewala Murder Case: अटारी बॉर्डरजवळ पोलीस-गँगस्टर्स यांच्यात चकमक, मुसेवालाचे मारेकरी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 03:27 PM2022-07-20T15:27:45+5:302022-07-20T15:28:36+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, एका निर्जन ठिकाणी असलेल्या एका जुन्या हवेलीत जगरूप सिंग रूपा आणि मन्नू कुसा हे दोन गँगस्टर्स लपून बसले होते.

Sidhu Moosewala Murder Case Police-Gangsters Encounter near Attari Border, Musewala's Killer Killed | Sidhu Moosewala Murder Case: अटारी बॉर्डरजवळ पोलीस-गँगस्टर्स यांच्यात चकमक, मुसेवालाचे मारेकरी ठार

Sidhu Moosewala Murder Case: अटारी बॉर्डरजवळ पोलीस-गँगस्टर्स यांच्यात चकमक, मुसेवालाचे मारेकरी ठार

Next

पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील गँगस्टर आणि पंजाब पोलीस यांच्यात अटारी बॉर्डरजवळ चकमक उडाली आहे. यात शूटर जगरूपसिंग रुपा आणि मन्नू कुसा या दोघांचा खात्मा करण्यात आला आहे. या एन्काउंटरमध्ये दोन-तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. अटारी बॉर्डरजवळ अजूनही पोलीस आणि गँगस्टर यांच्यात गोळीबार सुरू आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पोलिसांच्या अनेक गाड्या भारत-पाक सीमेच्या दिशेने एनकाउंटर टीमच्या मदतीसाठी पोहोचत आहेत.  एका निर्जन ठिकाणी असलेल्या जुन्या हवेलीत जगरुप सिंग रूपा आणि मन्नू कुसा हे दोन गँगस्टर्स लपून बसले होते. ही चकमक सुमारे दोन तासांपासून सुरू आहे. अर्थात गँगस्टर्सकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आहे. पोलिसांचे काही प्रमुख अधिकारीही घटनास्थळावर उपस्थित आहेत. 

गँगस्टर जगरूप सिंग (रूपा) संदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर दोन्हीकडूनही जरदस्त फायरींग सुरू झाली. यानंतर अनेक राउंड्स फायर झाले. जगरूप सिंग रूपा आणि मन्नू कूसा हे दोघेही शार्प शूटर्स आहेत. पोलीस सूत्रांनी दिेलल्या माहितीनुसार, या चकमकीत रुपाचा आणि मन्नूचाही खात्मा झाला आहे. या चकमकीत तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Sidhu Moosewala Murder Case Police-Gangsters Encounter near Attari Border, Musewala's Killer Killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.