Gangrape : गँगरेपनंतर गर्भनिरोधक गोळ्या दिल्या, रेस्टॉरंट मालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 01:04 PM2022-06-06T13:04:00+5:302022-06-06T13:15:46+5:30

Gangrape Case : पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गँगरेपच्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Restaurant owner arrested for giving birth control pills after gangrape | Gangrape : गँगरेपनंतर गर्भनिरोधक गोळ्या दिल्या, रेस्टॉरंट मालकाला अटक

Gangrape : गँगरेपनंतर गर्भनिरोधक गोळ्या दिल्या, रेस्टॉरंट मालकाला अटक

Next

राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूरमध्ये रेस्टॉरंट चालकावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप (Allegations) करण्यात आला आहे. या अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून महिनाभर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्याही खाऊ घातल्या. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गँगरेपच्या दोन्ही आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे.


पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मथुरा गेट पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी महावीर सैनी आणि त्रिदेव सैनी यांच्या संपर्कात दोन मुली होत्या. दोन्ही आरोपींनी पीडितेला त्यांच्यामार्फत रेस्टॉरंटमध्ये बोलावले. रेस्टॉरंट मालकाने पीडितेला कोल्ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ टाकून तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ बनवला. तक्रारीनंतर पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पीडित मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, दोन्ही आरोपींनी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. गर्भधारणा होऊ नये म्हणून आरोपीने पीडितेला जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या खाऊ घातल्या. मथुरा गेट पोलिस स्टेशनचे प्रभारी रामनाथ यांनी सांगितले की, महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर दोन आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराची तक्रार केली होती. पोलिसांनी दोघांवर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

 

Web Title: Restaurant owner arrested for giving birth control pills after gangrape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.