पोलिसानेच केली लाचखोर पोलिसाविरोधात एसीबीत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 05:44 PM2018-12-12T17:44:23+5:302018-12-12T17:47:57+5:30

नंतर एसीबीने याप्रकरणाची पडताळणी करून लाचखोर महिला पोलिसांविरोधात नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाचखोर महिलेचे नाव मीनाक्षी रोशन खोब्रागडे (वय ३७) असं आहे. 

Police gave the payment to the bribe police | पोलिसानेच केली लाचखोर पोलिसाविरोधात एसीबीत तक्रार

पोलिसानेच केली लाचखोर पोलिसाविरोधात एसीबीत तक्रार

Next
ठळक मुद्देलाचखोर महिला पोलिसांविरोधात नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल तक्रारदार पोलिसाने ३० ऑक्टोबरला एसीबीमध्ये तक्रार दाखल केलीलाचखोर महिलेचे नाव मीनाक्षी रोशन खोब्रागडे (वय ३७) असं आहे

नवी मुंबई - ३० वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने चक्क पोलीस आयुक्तालयात लिपिक लेख शाखेत काम करणाऱ्या लाचखोर महिलेची लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. नंतर एसीबीने याप्रकरणाची पडताळणी करून लाचखोर महिला पोलिसांविरोधात नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाचखोर महिलेचे नाव मीनाक्षी रोशन खोब्रागडे (वय ३७) असं आहे. 

तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या वडिलांच्या ऑपरेशनचे एम.पी.के.वाय आरोग्य योजना, मुंबई  येथून मंजूर होऊन आलेले वैद्यकीय बिल ट्रेझरीमध्ये पाठिवण्याकरीता आरोपी मीनाक्षी खोब्रागडेने आठ हजार रुपये लाचेच्या रक्कमेची मागणी केली. त्यांनतर याबाबत तक्रारदार पोलिसाने ३० ऑक्टोबरला एसीबीमध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी एसीबीने पडताळणी केली. दरम्यान आज दुपारी २. २२ वाजताच्या सुमारास एसीबीने मीनाक्षी खोब्रागडेंविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Web Title: Police gave the payment to the bribe police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.