Oxygen Tanker Missing : ऑक्सिजनने भरलेला टँकर बेपत्ता; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:24 PM2021-04-23T17:24:37+5:302021-04-23T17:26:46+5:30

Oxygen Tanker Missing : हा टँकर इच्छितस्थळी पोहोचलाच नाही अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर मनजीत सिंग यांनी माहिती दिली.  

Oxygen Tanker Missing: Oxygen tanker went missing; Filed a complaint at the police station | Oxygen Tanker Missing : ऑक्सिजनने भरलेला टँकर बेपत्ता; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

Oxygen Tanker Missing : ऑक्सिजनने भरलेला टँकर बेपत्ता; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्देदेशभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला असून त्यादरम्यान टँकर चोरीस गेल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे.

हरियाणा येथे पानीपत रिफायनरीहून सिरसा येथे जात असलेला ऑक्सिजन द्रव्याने भरलेला टँकर बेपत्ता झाला आहे. पानीपतमधील ड्रग कंट्रोल ऑफिसर विजय राजे यांनी या प्रकरणी पानिपतच्या बोहली पोलीस ठाण्यात ऑक्सिजन टँकर चोरी झाल्याची तक्रार केली आहे. हा टँकर पानीपतहून सिरसाला रवाना करण्यात आला होता. दरम्यान, हा टँकर इच्छितस्थळी पोहोचलाच नाही अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर मनजीत सिंग यांनी माहिती दिली.  

देशातील अनेक कोविड हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला असून त्यादरम्यान टँकर चोरीस गेल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे. आता पानीपतसह सिरसाचे पोलिसही टँकरचा शोध घेत घेत आहेत. टँकरवर पंजाबचा नंबर असून चालकही बेपत्ता आहे. पानीपत रिफायनरीमध्ये एअर लिक्विड नॉर्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऑक्सिजनचा पुरवठा करते. या कंपनीतून बुधवारी रात्री एक ऑक्सिजन टँकर सिरसाला रवाना करण्यात आला होता. या टँकरमध्ये ८ टन ऑक्सिजन आहे. याची किंमत जवळपास १ लाख १० हजार रुपये इतकी आहे.


पानीपतहून सिरसाला पोहोचण्यासाठी सव्वा चार तास इतका कालावधी लागतो. मात्र, या वेळेत सिरसामध्ये टँकर न पोहोचल्याने पानीपतमध्ये कंपनीत संपर्क करण्यात आला. या प्रकरणी ड्रग कंट्रोल ऑफिसरलाही कळवण्यात आलं. टँकर चालकाचा फोनही बंद येत आहे. टँकरचा शोध सुरू आहे. टँकर चालकाचे शेवटचे लोकेशन तपासले जात आहे. मोबाइलचे कॉल डिटेल्स काढले जात आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दुसर्‍या घटनेत हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी बुधवारी असा आरोप केला होता की, पानिपतहून फरीदाबादकडे रूग्णालयांमधील कोविड रूग्णांसाठी वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन जाणारे टँकर दिल्ली सरकारकडून त्यांच्या सीमेवर लुटले होते.

Web Title: Oxygen Tanker Missing: Oxygen tanker went missing; Filed a complaint at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.