कुडचडेत भिंतीला भगदाड पाडून सराफाचे दुकान लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 04:31 PM2018-11-10T16:31:39+5:302018-11-10T16:32:08+5:30

सुदैवाने सोन्याचे दागिने लॉकरमध्ये असल्याने सुरक्षित राहिले; मात्र दीड लाखांची चांदी मात्र पळवली

Looted the brick wall in a clay | कुडचडेत भिंतीला भगदाड पाडून सराफाचे दुकान लुटले

कुडचडेत भिंतीला भगदाड पाडून सराफाचे दुकान लुटले

Next



मडगाव - गोव्यात सगळीकडे दिवाळीची धामधूम चालू असतानाच मडगावपासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या कुडचडे येथील अशोक कोलवेकर यांच्या सराफी दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सुमारे दीड लाखांची चांदी लंपास केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली असून यातील नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी ही चोरी झाली आहे ते ठिकाण कुडचडेच्या पोलीस चौकीपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे. यातील सुदैवाची गोष्ट म्हणजे सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवल्याने चोरटे त्यांना हात लावू शकले नाहीत. या घटनेने संपूर्ण कुडचडे शहरात व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ज्या ठिकाणी ही चोरी झाली आहे ती जागा कुडचडे बाजारपेठेत जरी असली तरी रात्री 9 नंतर या भागात तसा शुकशुकाटच असतो. याच स्थितीचा फायदा चोरटय़ांनी उठवून ही चोरी केली. या चोरीत सुमारे दीड लाखांचे चांदीचे ऐवज दुकानात कपाटातच ठेवण्यात आले होते ते चोरटय़ांनी पळवले. याच दुकानाच्या बाजूला एक क्लिनीक असून चोरटय़ांनी सुरुवातीला या क्लिनीकच्या भिंतीला मागच्याबाजूने भगदाड पाडले आणि आत प्रवेश केला. त्यानंतर या क्लिनीकला लागून असलेल्या सराफी दुकानात क्लिनीकच्या भिंतीला भोक पाडून ते आत शिरले. आत शिरण्यासाठी त्यांनी क्लिनीकमध्ये असलेल्या टॉर्चचा वापर केल्याचेही उघड झाले आहे. चोरटय़ांनी कपाटातील सगळा ऐवज लंपास केला. मात्र सोन्याचे दागिने लॉकरमध्ये असल्याने ते सहीसलामत राहिले.
वास्तविक कोलवेकर यांचे दुकान शनिवारी बंद असते. शनिवारी सकाळी ही चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर बाजारपेठेतील व्यापा:यांनी कोलवेकर यांना फोनवरुन चोरीची माहिती दिल्यानंतर ते दुकानात आले. मात्र या चोरीत आपले सोन्याचे दागिने सहीसलामत राहिल्याने या दु:खाच्या स्थितीतही त्यांनी समाधानाचा श्र्वास सोडला. असे जरी असले तरी कुडचडेतील इतर व्यापा:यांसाठी मात्र हा चोरीचा प्रकार भितीदायकच ठरला. कुडचडे पोलिसांनी घटनास्थळावर येऊन नंतर पंचनामाही केला.

Web Title: Looted the brick wall in a clay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.