आरोपी अल्पवयीन नाही, तो प्रौढच! कठुआ बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 01:26 PM2022-11-16T13:26:51+5:302022-11-16T13:30:38+5:30

कठुआ येथे ८ वर्षांच्या चिमुरडीवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती

Kathua Gang Rape Case and murder minor accused will be treated as adult says supreme court | आरोपी अल्पवयीन नाही, तो प्रौढच! कठुआ बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

आरोपी अल्पवयीन नाही, तो प्रौढच! कठुआ बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

googlenewsNext

Kathua Gang Rape Case: जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे ८ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा आदेश दिला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी याच्याविरुद्धचा खटला आता प्रौढ मानून चालवला (minor accused will be treated as adult) जाणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला म्हणाले की, इतर पुरावे उपलब्ध नसताना न्यायालयाने अल्पवयीन मुलाच्या वयाबाबत वैद्यकीय व्यावसायिकांचे मत विचारात घ्यावे. वैद्यकीय पुराव्यावर विश्वास ठेवता येईल की नाही हे पुराव्याच्या महत्त्वावर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुनावणीत म्हटले की, सीजेएम कठुआने पारित केलेला आदेश रद्द केला जात आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या वेळी आरोपीला अल्पवयीन मानले जाणार नाही, त्याला प्रौढ मानले जाईल.

कठुआ सामूहिक बलात्काराचा घटनाक्रम

कठुआ बलात्काराची घटना १० जानेवारीला झाली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलगी 10 जानेवारी रोजी दुपारी घोड्यांना चरायला घरातून निघाली होती आणि त्यानंतर ती घरी परतली नाही. तब्बल एक आठवड्यानंतर १७ जानेवारीला त्या मुलीचा मृतदेह जंगलात सापडला. वैद्यकीय अहवालात या मुलीवर अनेक दिवस अनेकवेळा सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि तिला दगडाने ठेचून ठार करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर बालिकेवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येवरून देशभरात खळबळ उडाली होती. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्येही त्यावर टीका झाली होती.

कुटुंबीयांनी केली होती निदर्शने

मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी परिसरात निदर्शने करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये लोकांनी गोंधळ घातला आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली. २० जानेवारी रोजी पोलीस ठाण्याच्या SHOला सरकारने निलंबित केले होते आणि या प्रकरणाच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर २३ जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या मेहबुबा मुफ्ती सरकारने हे प्रकरण राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवले. त्यांनी विशेष तपास पथक तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

विशेष पोलीस अधिकारीही गुन्ह्यात सामील

तपासादरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिकारी असलेले उपनिरीक्षक आनंद दत्ता यांना गुन्हे शाखेने अटक केली. तपास जसजसा पुढे सरकला, तसतसा या सामूहिक बलात्कार प्रकरणात जम्मू-काश्मीरचे विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया यांचाही सहभाग असल्याचे आढळून आले. १० फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेने दीपक खजुरियालाही अटक केली होती.

७ आरोपी, १ अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले होते!

या प्रकरणी पोलिसांनी एकूण ७ जणांना अटक केली असून त्यापैकी एक अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीतही अल्पवयीन आरोपी १९ वर्षांचा असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनेतील मुख्य आरोपीने स्वत: आत्मसमर्पण केले होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया, पोलीस अधिकारी सुरेंद्र कुमार, रसना गावचे परवेश कुमार, सहाय्यक उपनिरीक्षक आनंद दत्ता, हेड कॉन्स्टेबल टिळक राज, माजी महसूल अधिकाऱ्याचा मुलगा विशाल आणि त्याचा चुलत भाऊ (अल्पवयीन) यांचा समावेश होता. या घटनेमुळे सत्ताधारी पीडीपी आणि मित्रपक्ष भाजप यांच्यातील तणावही वाढला होता.

Web Title: Kathua Gang Rape Case and murder minor accused will be treated as adult says supreme court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.