इंग्लंडचा व्हिसा मिळवुन देण्याच्या आमिषाने उकळले चार लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 02:11 PM2019-02-05T14:11:22+5:302019-02-05T14:12:06+5:30

सुमारे ४ लाख २७ हजार ७६० रुपये उकळल्यानंतरही फिर्यादीला व्हिसा दिला नाही..

Four million fraud due to given England's visa | इंग्लंडचा व्हिसा मिळवुन देण्याच्या आमिषाने उकळले चार लाख

इंग्लंडचा व्हिसा मिळवुन देण्याच्या आमिषाने उकळले चार लाख

Next

पिंपरी : इंग्लंड देशाचा व्हिसा मिळवुन देतो असे सांगून भामट्यांनी वाकड येथील एकाची तब्बल ४ लाख २७ हजार ७६० रुपयांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली असून दोन भामट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमंत गिरीश तरे (वय २६, वाकड) यांनी फसवणूक प्रकरणी वाकड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अनिता विल्यम, मायकल केनेडी अशी आरोपींची नावे आहेत. इंग्लंडचा व्हिसा मिळवुन देतो असे सांगून आरोपींनी फिर्यादीकडून वेळोवेळी मोठी रक्कम उकळली. सुमारे ४ लाख २७ हजार ७६० रुपये उकळल्यानंतरही फिर्यादीला व्हिसा दिला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. वाकड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Four million fraud due to given England's visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.