तोतया आयकर, पोलीस अधिकारी बनून दरोडा घालणारी टोळी जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 06:46 PM2018-08-29T18:46:14+5:302018-08-29T18:56:17+5:30

आरोपींकडून चोरलेले 2,75,000/- रुपये व दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेले खोटे लायटरचे पिस्तूल , हण्ड्ग्लोज सह मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. 

Fake income office and police officer arrested who has done dacoity offence | तोतया आयकर, पोलीस अधिकारी बनून दरोडा घालणारी टोळी जेरबंद 

तोतया आयकर, पोलीस अधिकारी बनून दरोडा घालणारी टोळी जेरबंद 

googlenewsNext

ठाणे - आयकर आणि पोलीस अधिकारी असल्याचे सांगून दरोडा टाकणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. ५ ऑगस्ट रोजी रात्री 10:30  वाजता ओमकार टॉवर जुना पाडा काशिमीरा येथे राहणाऱ्या गोविंद छोटेलाल सिंग यांच्या घरी तीन इसमांनी आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून प्रवेश केला आणि लायटर पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचे व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून तिजोरीतील तीन लाख रुपये आणि 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला. याबाबत  गोविंद सिंग यांनी कशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

असा गंभीर स्वरूपाचा दाखल झाल्यानंतर ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ .शिवाजी राठोड यांनी वेगवेगळी पोलीस पथक तयार करून तपासाला सुरुवात केली. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना घटनास्थळाहून ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुख्य आरोपी फैयाज कदर काझी (वय 47) याला चिंचवड, पुणे येथून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने इतर चार साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुल केले. मानव सुशील सिंग (वय 19) राहणारा कनकिया मीरारोड शोएब मन्सुर मुन्शी (वय 19) राहणारा जीसीसी क्लबजवळ मीरा रोड, सलीम उर्फ साहील फिरोज अन्सारी (वय 21) राहणारा बुरहानपुर राज्य मध्य प्रदेश, इम्रान मुन्ना अली (वय 25) राहणार मुंब्रा ठाणे या चार आरोपींना अटक करण्यात आली. हा गुन्हा दरोड्याचा असल्याने भा. दं. वि. कलम 395 चा समावेश करण्यात आला. हे सर्व आरोपी विशेष शिकलेले नसून टवाळखोरी करत फिरत असत . त्यातील मुख्य आरोपी फैयाज काझीचा मुंबई येथे भंगारचा धंदा होता. तेथेच एका हॉटेलमध्ये सलीम आणि इम्रान हे वेटरचे काम करत. तिथेच त्यांची फैयाज काझीसोबत  ओळख झाली होती. शोएब हा फैयाजचा भाचा असून त्याने आणि मानव याने गोविंद सिंग याच्या घरचा पत्ता, आर्थिक स्थिती  घरातील एकूण सदस्य त्यांच्या येण्याजाण्याची वेळा याबद्दलची इत्यंभूत माहिती फैयाज, सलीम आणि इम्रान यांना पुरवली व या माहितीच्या आधारे त्यांनी हा गुन्हा केला. सात आठ दिवसांपासून त्यांनी या सगळ्या ठिकाणाची माहिती काढली होती. या आरोपींकडून चोरलेले 2,75,000/- रुपये व दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेले खोटे लायटरचे पिस्तूल , हण्ड्ग्लोज सह मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.  त्यांनी अशा प्रकारचे अजून काही गुन्हे केले आहेत का ? याची सखोल चौकशी पोलिस करत असल्याचे पोलीस अधीक्षक  डॉ .शिवाजी राठोड यांनी सांगीतले. 

Web Title: Fake income office and police officer arrested who has done dacoity offence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.