रमेश कदमांना तुरुंगातून फ्लॅटवर जाण्यास केलेली मदत पडली महागात, पोलिसावर बडतर्फीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 05:49 PM2019-10-20T17:49:40+5:302019-10-20T17:51:53+5:30

पवार यांच्यासह चौघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Due to help prisoner Ramesh kadam for going to home Psi pawar has dismissed in Thane | रमेश कदमांना तुरुंगातून फ्लॅटवर जाण्यास केलेली मदत पडली महागात, पोलिसावर बडतर्फीची कारवाई

रमेश कदमांना तुरुंगातून फ्लॅटवर जाण्यास केलेली मदत पडली महागात, पोलिसावर बडतर्फीची कारवाई

Next
ठळक मुद्देएका खासगी फ्लॅटमध्ये घेऊन जाण्यास मदत करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार यांच्यावर कारवाई करत पोलीस आयुक्तांनी त्यांना बडतर्फ केले आहे. पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण, दत्तू खेताडे, उत्तम कांबळे आणि विकास गायकवाड यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. 

ठाणे - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचारासाठी न्यायालयीन कोठडीत असलेले तसेच सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे आमदार रमेश कदम यांना खासगी वाहनातून घोडबंदर रोडवरील एका खासगी फ्लॅटमध्ये घेऊन जाण्यास मदत करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार यांच्यावर कारवाई करत पोलीस आयुक्तांनी त्यांना बडतर्फ केले आहे. पवार यांच्यासह चौघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे पोलीस दलात एकाच खळबळ माजली आहे. 

रोहिदास पवार यांच्यावर एका गुन्हेगारास मदत करणे, निवडणूक कर्तव्यात जाणीवपूर्वक कुचराई करणे, उमेवाडर्स मदर करणारे गंभीर गैरशिस्तीचे तसेच पोलीस दलाची प्रतिमा समाजात मालिन करणे असा ठपका ठेवण्यात आला असून पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण, दत्तू खेताडे, उत्तम कांबळे आणि विकास गायकवाड यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. 

साठे महामंडळातील भ्रष्टाचाराकरिता २०१५ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे तत्कालीन बडतर्फ आमदार कदम यांना अटक झाली होती. तेव्हापासून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मोहोळ मतदारसंघातून सध्या त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. १८ आॅक्टोबर रोजी वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली ते ठाणे कारागृहातून बाहेर पडले होते. मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर एका खासगी कारने ते ठाणे पोलीस मुख्यालयाचे उपनिरीक्षक पवार तसेच चार पोलीस कर्मचाऱ्यांसह ठाण्याकडे येत होते. दरम्यान वडाळा महामार्गावर पोलिसांची व्हॅन थांबवून रमेश कदम यांना त्याचा नोकर प्रतीक शिवपुजे याने आणलेल्या ओला कारने (वॅगनआर एमएच ४३, बीजी ३९४६) घोडबंदर येथील कदमांच्या फ्लॅटवर नेण्यात आले. ठाणे कारागृहापासून १० किमी अंतरावर असलेल्या पुष्पांजली रेसिडेन्सी इमारतीत कदम पोचले. 

बंदोबस्तावरील पोलिसांनीही सर्वच नियम धाब्यावर बसवत त्यांना ओवळा येथील पुष्पांजली रेसिडेन्सी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील राजू खरे यांच्या ३०१ क्रमांकाच्या फ्लॅटवर नेले. तेथून कदम हे पार्सल घेऊन निघण्याच्या तयारीत असतानाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग व कासारवडवली पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यावेळी कदम आणि राजू खरे यांच्याकडून ५३ लाख ४६ हजारांची रोकड हस्तगत केली होती. 

 

Web Title: Due to help prisoner Ramesh kadam for going to home Psi pawar has dismissed in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.