मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:54 AM2019-03-02T02:54:29+5:302019-03-02T02:54:32+5:30

यू टर्न घेताना अपघात : खराडी जकात नाक्याजवळील घटना

The death of one in a car | मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू

मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Next

पुणे : भरधाव वेगात यू टर्न घेण्याच्या नादात मोटारचालकाकडून बसलेल्या जोरदार धडकेत एका मोटारसायकलचालकाला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. जुना खराडी जकात नाक्याजवळील जीवनज्योत हॉस्पिटलसमोर ही घटना घडली.
त्या अज्ञात मोटारचालक आरोपीविरुद्ध आदित्य चव्हाण (वय १९, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत अब्रार जावेद बागवान (वय १९) याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अब्रार तळेगाव ढमढेरे येथून मोटारसायकलवरून पुण्याकडे जात असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या मोटारचालकाने भरधाव वेगाने यू टर्न घेण्याचा प्रयत्न केला. यात त्याची मोटार फिर्यादी यांच्यासमोर आडवी आल्याने मोटारीच्या पुढील बाजूच्या बंपरची धडक मोटारसायकलला लागली. त्यावेळी अब्रार खाली पडून त्याला गंभीर दुखापत झाली. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. रासकर अधिक तपास करीत आहेत.
एटीएम मशिनबरोबर छेडछाड करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी
पुणे : एटीएम मशिनबरोबर छेडछाड करून १६ हजार रुपये काढून बँक आॅफ इंडियाची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी राजस्थान येथील दोघांना अटक केली. न्यायालयाने दोघांना ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.
वकील नुरदिन खान (वय २२), दिलसाद हारून खान (वय २५, दोघेही रा. राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत रौफ रुस्तुमसाहब मणियार (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी जंगली महाराज रोड परिसरातील ए. टी. एम.मध्ये ही घटना घडली.
जंगली महाराज रोड येथील बँक आॅफ इंडियाच्या ए. टी. एम.मध्ये एका दुसऱ्या बँकेचे तीन ए. टी. एम.
कार्ड वापरून ए. टी. एम. मशीन जोडलेले संगणक व इंटरनेट स्विच बंद करून त्यामध्ये छेडछाड करत १६ हजार रुपये काढून घेत बँकेची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले
आहे.
याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता, आरोपींकडे १८ डेबिट कार्ड मिळाली असून, ती कार्ड कोणाची आहेत? त्यांचा इतर कोणी साथीदार आहे का? याचा शोध घेण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली.

मदतीचा बहाणा करून १७ हजारांची फसवणूक
४नवीन एटीएम कार्डचा पिन नंबर टाकून देण्याच्या बहाण्याने एकाने महिलेच्या हातातील एटीएम कार्ड बदलून १७ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी कॅम्प येथे राहणाºया महिलेने एका अनोळखी व्यक्तीविरोधात फिर्याद दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या नवीन एटीएम कार्डचा पिन जनरेट करण्याकरिता गेली असताना त्यांनी मदतीकरिता एका अज्ञात व्यक्तीस विनंती केली. त्यावेळी त्या व्यक्तीने फिर्यादीस आपला खाते नंबर टाकायला लावून मोबाईलवर ओटीपी क्रमांक आल्यानंतर ते एटीएम कार्ड स्वॅप करायला लावले. त्यानंतर फिर्यादी यांना पुन्हा नवीन पिन नंबर टाकायला लावून त्यांच्या हातातील एटीएम कार्ड तपासून घेत दुसरे एटीएम कार्ड दिले. अशा प्रकारे त्यांनी फिर्यादीच्या खात्यातून १७ हजार रुपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. गुजर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The death of one in a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.