मुंबईत वाहने चोरी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 08:43 PM2018-08-03T20:43:41+5:302018-08-03T20:44:36+5:30

गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने केली कारवाई 

Chains of the main plotter stealing vehicles in Mumbai | मुंबईत वाहने चोरी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बेड्या 

मुंबईत वाहने चोरी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बेड्या 

googlenewsNext

मुंबई - वाहन चोरीचा मुख्य सूत्रधार अयुबअली मासूमअली  शेख उर्फ गुड्डू इलेक्ट्रीशनला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या १५ दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. १८ जुलै रोजी चोरलेल्या गाड्यांची डिलेव्हरी करणाऱ्या सराईत आरोपीला बेड्या ठोकण्यास मालमत्ता कक्षास यश आले होते . या सराईत आरोपीचे नाव हजरतअली फकरुद्दीन खान (वय - ३२ ) हे आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच गाड्या जप्त करण्यात आल्या. त्यात डिझायर, वॅगनआर, शेवर्लेट इंजॉय, महिंद्र पिकअप टेम्पो, सॅण्ट्रो या गाड्यांचा समावेश होता. गेल्या वर्षी गाडीचोरीच्या गुह्यात शिक्षा भोगून खान बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा चोरीच्या गाड्यांच्या डिलेव्हरीचे काम सुरू केले होते. हजरतअलीच्या अटकेमुळेचपोलिसांना अयुबअलीला बेड्या ठोकण्यास सोपं झालं. 

वाहनचोरीचा म्होरक्या अयुबअली हा कुर्ला पूर्व येथील कुरेशी नगरमधील  गॅलेक्सी अपार्टमेंट येथे येणार असल्याची खात्रीलायक माहिती मालमत्ता कक्षाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथे सापळा रचून अयुबअलीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याविरोधात मुंबईत माटुंगा, विलेपार्ले, देवनार आणि दादर अशा विविध पोलीस ठाण्यात ऐकून १३ गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात तो जामीनावर असल्याचे त्याने सांगितले.  

http://www.lokmat.com/crime/arrest-man-who-delivers-stolen-vehicles/

Web Title: Chains of the main plotter stealing vehicles in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.