खाकीला काळिमा! लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला एसीबीने केली रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 01:33 PM2018-12-04T13:33:35+5:302018-12-04T13:36:45+5:30

मुंबई - इस्टेट एजंटकडून १० हजारांची लाच स्वीकारताना वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठेला (वय ३८) लाचलुचपत ...

Blackspot on Khaki ! The bribe police officer was arrested by the ACB | खाकीला काळिमा! लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला एसीबीने केली रंगेहाथ अटक

खाकीला काळिमा! लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला एसीबीने केली रंगेहाथ अटक

Next
ठळक मुद्देसहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठेला (वय ३८) लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केलीगुन्ह्यात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठेने इस्टेट एजंटकडे २० हजार रुपये रक्कम लाच म्हणून मागितली याबाबत तक्रारदार इस्टेट एजंटने एसीबीला माहिती दिली.

मुंबई - इस्टेट एजंटकडून १० हजारांची लाच स्वीकारताना वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठेला (वय ३८) लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार असलेल्या इस्टेट एजंटविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठेने इस्टेट एजंटकडे २० हजार रुपये रक्कम लाच म्हणून मागितली होती. याबाबत तक्रारदार इस्टेट एजंटने एसीबीला माहिती दिली. नंतर काल पडताळीत पिठेने २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार एसीबीने काल रात्री १ वाजताच्या सुमारास सापळा रचून १० हजारांची लाच स्वीकारताना वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठेला रंगेहाथ अटक केली आहे.



 

Web Title: Blackspot on Khaki ! The bribe police officer was arrested by the ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.