Vinayak Mete Accident Update: विनायक मेटे अपघातप्रकरणी मोठी अपडेट; चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, अटक होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 11:19 AM2022-11-16T11:19:03+5:302022-11-16T11:20:35+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ तीन महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. याबाबत ...

Big update on Vinayak Mete accident case; Driver Eknath Kadam charged with culpable homicide Rasayani Police Station, likely to be arrested by CID | Vinayak Mete Accident Update: विनायक मेटे अपघातप्रकरणी मोठी अपडेट; चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, अटक होणार

Vinayak Mete Accident Update: विनायक मेटे अपघातप्रकरणी मोठी अपडेट; चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, अटक होणार

googlenewsNext

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ तीन महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सीआयडीचा तपास पूर्ण झाला असून मेटेंच्या कारचा चालक हाच अपघातास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. 

Road Hypnosis: विनायक मेटेंचा ड्रायव्हर रोड हिप्नॉटिझमचा शिकार? काय असतो हा प्रकार

अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मेटे बीडकडून मुंबईकडे येत होते. पहाटे पाच वाजता हा अपघात झाला होता. चालकाने मेटेंना तासभर मदतच मिळाली नसल्याचा आरोप केला होता. चालक एकनाथ कदम याने रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत, असे म्हटले होते. 

आता हाच चालक दोषी असल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे. विनायक मेटेंच्या कारचा चालक एकनाथ कदमवर  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीआयडीने रसायनी पोलीस ठाण्यात ३०४ a, 304 -2 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

कदम हा मेटेंची कार १४०-१५० किमीच्या वेगाने चालवत होता. भातन बोगद्याजवळ आल्यावर त्याने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने उजव्या बाजुच्या लेनमध्ये गाडी घातली. परंतू तिथे आणखी एक गाडी ओव्हरटेक करत होती. ओव्हरटेक करता येणार नाही हे समजल्यावरही त्याने त्या लेनमधून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे मेटेंची कार डाव्या बाजुने आदळली. 
सकृतदर्शनी कदम हाच मेटेंच्या अपघाती मृत्यूस आणि अपघातास कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्याला लवकरच ताब्यात घेऊन अटक करण्यात येणार आहे. गुन्ह्यात वापरलेल्या कलमांनुसार कदम याला दोन ते चार वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. 

Read in English

Web Title: Big update on Vinayak Mete accident case; Driver Eknath Kadam charged with culpable homicide Rasayani Police Station, likely to be arrested by CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.