दहा दिवसांनी होणार होतं लग्न, तरूणीने विवाहित प्रियकरासोबत खाल्लं विष आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 12:23 PM2023-05-20T12:23:34+5:302023-05-20T12:24:00+5:30

Crime News : भरतकूप भागात राहणारा एक तरूण बांदाच्या बदौसा भागात रेल्वे विभागात गेटमॅन म्हणून काम करत होता. त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याला 2 मुलेही होती.

Banda lovers consumed sulfas pills girlfriend died boyfriend in critical condition end of love story | दहा दिवसांनी होणार होतं लग्न, तरूणीने विवाहित प्रियकरासोबत खाल्लं विष आणि मग....

दहा दिवसांनी होणार होतं लग्न, तरूणीने विवाहित प्रियकरासोबत खाल्लं विष आणि मग....

googlenewsNext

Crime News : प्रेम प्रकरणाच्या अशा अशा घटना समोर येत असतात ज्या वाचून हैराण व्हायला होतं. उत्तर प्रदेशच्या बांदामधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका प्रेमी युगुलाने त्यांचं लग्न झालं नाही म्हणू विष खाल्लं. ज्यानंतर प्रेयसीचा मृत्यू झाला तर प्रियकर गंभीर आहे. यामुळे या लव्हस्टोरीचा एन्ड झाला.

मिळालेल्या मीहितानुसार, भरतकूप भागात राहणारा एक तरूण बांदाच्या बदौसा भागात रेल्वे विभागात गेटमॅन म्हणून काम करत होता. त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याला 2 मुलेही होती. पण काही वर्षापासून शेजारच्या एका मुलीसोबत त्याचं अफेअर सुरू होतं. पोलिसांनुसार, तरूणीच्या कुटुंबियांनी तिचं लग्न दुसऱ्या तरूणासोबत ठरवंल होतं.

तरूणीने लग्नास नकार दिला होता. तिला तिच्या विवाहित प्रियकरासोबत रहायचं होतं. पण कुटुंबियांसमोर तिचं काही चालू शकलं नाही. 31 मे रोजी तरूणीचं लग्न होतं. जेव्हा याची माहिती तरूणीच्या विवाहित प्रियकराला मिळाली तेव्हा दोघांनी ठरवलं की, ते जिवंत असताना एकमेकांचे होऊ शकले नाहीत, अशात त्यांनी सुसाइडचा प्लान केला.

दोघांनी गुरूवारी सांयकाळी विषारी पदार्थाचं सेवन केलं. जेव्हा त्यांची तब्येत बिघडली तेव्हा दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला. तेच प्रियकराची स्थिती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांना सूचना मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी प्रेयसीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. तसेच चौकशीही सुरू केली आहे. प्रियकर शुद्धीवर येण्याचा पोलीस वाट बघत आहेत. त्याच्या जबाबानंतर कारवाई केली जाईल.

Web Title: Banda lovers consumed sulfas pills girlfriend died boyfriend in critical condition end of love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.