अबब! दीड कोटींचे कासव, ६० लाखांचे ४ मांडूळ वनविभागाने केले हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 08:29 PM2018-10-08T20:29:20+5:302018-10-08T20:30:34+5:30

हे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय वनविभागाच्या कल्याण वन परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांनी व्यक्त करीत त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे सांगितले.

Aub! Hundred crores of turtles, 60 lakhs of four cattle forests have been captured | अबब! दीड कोटींचे कासव, ६० लाखांचे ४ मांडूळ वनविभागाने केले हस्तगत

अबब! दीड कोटींचे कासव, ६० लाखांचे ४ मांडूळ वनविभागाने केले हस्तगत

Next

कल्याण - कल्याणमध्येवनविभागाने केलेल्या कारवाईत सुमारे दीड कोटींचे कासव आणि ६० लाख किंमतीचे चार मांडूळ हस्तगत केले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ  व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ वनविभागच्या हाती लागला वनविभागाने या  व्हिडीओमध्ये दुर्मिळ जातीचे साप व कासव दिसत असल्याने या जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर कल्याण पश्चिमेतील सापर्डे येथे हे साप असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे वनविभागाने एका घरावर छापा मारत त्या घरातून चार दुर्मिळ जातीचे मांडूळ व एक मृदू पाठीचे कासव हस्तगत केले. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्यांच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. हे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय वनविभागाच्या कल्याण वन परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांनी व्यक्त करीत त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे सांगितले.

Web Title: Aub! Hundred crores of turtles, 60 lakhs of four cattle forests have been captured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.