दुचाकीवरून पळवून नेत मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 12:50 PM2022-09-07T12:50:19+5:302022-09-07T12:51:06+5:30

दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करीत खाणीचा मारोती येथील शेतातून १० वर्षीय अल्पवयीन मुलगी, पीडित मुलीचा अल्पवयीन मावसभाऊ या दोघांना दुचाकीवरून जबरदस्तीने बसवून पळवून नेले.

A girl was abducted from a bike and raped | दुचाकीवरून पळवून नेत मुलीवर अत्याचार

दुचाकीवरून पळवून नेत मुलीवर अत्याचार

googlenewsNext

परभणी : सेलू शहरातील १० वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्या मावसभावास दुचाकीवरून पळवून नेत मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सेलू तालुक्यात घडली. याप्रकरणी सेलू ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला. 

दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करीत खाणीचा मारोती येथील शेतातून १० वर्षीय अल्पवयीन मुलगी, पीडित मुलीचा अल्पवयीन मावसभाऊ या दोघांना दुचाकीवरून जबरदस्तीने बसवून पळवून नेले. त्यापैकी मुलास वालूरमार्गे नेत कौसडी फाटा रस्त्यावर सोडून देत पीडित मुलीस कोक शिवारात नेत जबरदस्तीने अत्याचार केला. नातेवाईकांना अल्पवयीन मुलगा, मुलीस पळवून नेल्याचे समजले. यात जिंतूरच्या दिशेने त्यांना पळविल्याचे नातेवाईकांनी सेलू पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी बोरी पोलिसांना ही माहिती कळविली. बोरीचे सपोनि वसंत मुळे यांच्या पथकाला पीडित मुलगी कोक शिवारात सोमवारी सायंकाळी ५ वाजता आढळली. त्यानंतर पीडित मुलीस सेलूत आणण्यात आले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने सेलू ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी पहाटे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: A girl was abducted from a bike and raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.