मतीन यांच्या अपात्रतेचा ठराव राज्य शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:29 AM2018-08-19T00:29:46+5:302018-08-19T00:31:39+5:30

एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता. या ठरावाची प्रत, कारणापुरता उतारा, सभेतील व्हिडिओ चित्रफीत, फोटो आज सायंकाळी महापौरांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे सादर केले. मनपा प्रशासन याची कायदेशीर तपासणी करून प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणार आहे.

The state government has a resolution of Mrine's disqualification | मतीन यांच्या अपात्रतेचा ठराव राज्य शासनाकडे

मतीन यांच्या अपात्रतेचा ठराव राज्य शासनाकडे

googlenewsNext
ठळक मुद्देसहा वर्षे बंदी घाला : नगरसेवकपद कायमस्वरूपी रद्द करावे

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता. या ठरावाची प्रत, कारणापुरता उतारा, सभेतील व्हिडिओ चित्रफीत, फोटो आज सायंकाळी महापौरांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे सादर केले. मनपा प्रशासन याची कायदेशीर तपासणी करून प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणार आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीस विरोध करणाऱ्या सय्यद मतीन यांना बेदम मारहाण झाली होती.
मतीन यांनी यापूर्वीही सर्वसाधारण सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रस्तावाला विरोध केला होता. तसेच सभागृहात वंदेमातरम म्हणण्यास नकार देत ते खालीच बसले होते.
शुक्रवारी सकाळी १२.१५ वाजता मनपाची सभा आयोजित केली होती. सभेत वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी अचानक एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी ‘आम्ही आजपर्यंत बाबरी मशीद विसरलो नाही, माझा या श्रद्धांजलीस विरोध आहे, हा विरोध नोंदवून घ्यावा.’ मतीन यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या सहा नगरसेवकांनी त्यांना सभागृहातच बेदम मारहाण केली. नंतर मतीन यांच्याविरोधात अत्यंत शिवराळ भाषेत नगरसेवकांनी आपला रोष व्यक्त केला. त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावाची प्रत, कारणापुरता उतारा, व्हिडिओ चित्रीकरण, फोटो आज सायंकाळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी आयुक्तांकडे सुपूर्द केले.
अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी, विधि सल्लागार अपर्णा थेटे या प्रस्तावाची कायदेशीर छाननी करू आयुक्तांसमोर प्रस्ताव ठेवणार आहेत. आयुक्तांच्या मंजुरीनंतर त्वरित शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. प्रस्तावात मतीन यांना सहा वर्षांसाठी निवडणुकीस अपात्र ठरवा अशीही मागणी करण्यात आली आहे.
मतीन यांची स्टंटबाजी
महापालिकेत मागील तीन वर्षांपासून सतत वेगवेगळ्या कारणाने मतीन स्टंटबाजी करीत आहेत. शुक्रवारीही दोन वेळेस ते बोलण्यासाठी उभे राहिले. मी त्यांना परवानगी दिली नाही. तिसºया वेळेस ते बालू लागले. भाजपच्या नगरसेवकांना त्यांनी स्वत:हून आपल्या अंगावर ओढून घेतले. श्रद्धांजलीचा कोणताही ठराव नव्हता. त्यामुळे माझा श्रद्धांजलीस विरोध असल्याचे नोंदवून घ्या म्हणणे चुकीचे असल्याचे महापौर घोडेले यांनी नमूद केले.
महापौर भाजपच्या पाठीशी
महापालिकेच्या सभागृहात पीठासन अधिकाºयांना कायद्याने सर्वात जास्त अधिकार दिलेले आहेत. सभागृहात शुक्रवारी झालेल्या प्रकारानंतर पोलिसांनी भाजप नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यापूर्वी एकदाही पीठासन अधिकाºयाला विचारले नाही. पोलिसांनी परस्पर गुन्हे दाखल करणे ही बाबही अत्यंत चुकीची असल्याबद्दल महापौर तथा पीठासन अधिकारी नंदकुमार घोडेले यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
सभागृहात भूमिका मांडणार
मतीन यांना यापुढे महापालिका सभागृहात कधीच येऊ देणार नाही. प्रत्येक सभेपूर्वी हा निर्णय घेण्यात येईल. भविष्यात सभेत कोणते निर्णय होतील हे आज घोषित करणे चुकीचे राहील. प्रत्येक सभेत सुरक्षारक्षकांना मतीन यांना प्रवेश देऊ नका, असे निर्देश देण्यात येणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.
अटक आणि पोलीस कोठडी
एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद यांना अटक करून पोलिसांनी शनिवारी (दि.१८) न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गझाला-अल-आमोदी यांनी मतीन यांना एक दिवसाची (दि.१९) पोलीस कोठडी सुनावली.
उपमहापौर विजय साईनाथ औताडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिसांनी सय्यद मतीन यांच्याविरुद्ध भादंवि कलम २९४, १५३ आणि १५३ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी मतीन यांना न्यायालयात हजर केले. अभियोग पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मतीन यांनी सभेत जातिवाचक आणि तणाव वाढेल असे वक्तव्य करून दोन समाजात द्वेष निर्माण होईल असे कृत्य केले व जमावाला चिथावणी दिली. जमावाने दोन वाहनांची तोडफोड केली. दोन लोकांना जखमी केले. त्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे.
त्यांच्याकडून दोन मोबाईल हँडसेट ताब्यात घेतले आहेत. त्यांनी मोबाईलचा वापर करून इतर साथीदारांना ‘टेक्स्ट’ आणि ‘व्हॉटस्अ‍ॅप’ मेसेज पाठवून तसेच फोन कॉल करून, चिथावणी देऊन भाजप पदाधिकाºयांच्या वाहनांच्या काचा फोडल्या. फरार आरोपींना अटक करावयाची आहे.
मतीन हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, त्यांच्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी हिंदू-मुस्लिम दंगलीत सक्रिय होऊन, मुस्लिम जमावाला चिथावणी देऊन दंगल घडविली आहे. महापालिकेत ‘वंदेमातरम’ गीताला विरोध करून तोडफोड केली. गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

Web Title: The state government has a resolution of Mrine's disqualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.