औरंगाबादमध्ये आजपासून ‘लोकमत महाएक्स्पो’त होणार खरेदीची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:55 PM2018-01-25T12:55:06+5:302018-01-25T12:57:14+5:30

अखेर सर्व जण ज्या महाप्रदर्शनाची आतुरतेने वाटत पाहत होते तो ‘लोकमत महाएक्स्पो’ आजपासून सुरू होत आहे. ‘लोकमत समूहा’तर्फे आयोजित या महाप्रदर्शनाचे एस. एफ. एस. मैदानावर गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून हे प्रदर्शन सुरु होणार आहे.

shopping Dhoom starts at 'Lokmat MahaXpo' Aurangabad | औरंगाबादमध्ये आजपासून ‘लोकमत महाएक्स्पो’त होणार खरेदीची धूम

औरंगाबादमध्ये आजपासून ‘लोकमत महाएक्स्पो’त होणार खरेदीची धूम

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत समूहा’तर्फे आयोजित या महाप्रदर्शनाचे एस. एफ. एस. मैदानावर गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून हे प्रदर्शन सुरु होणार आहे.   ४० हजार चौरस फूट जागेवर उभारलेल्या एकूण ३०० अद्ययावत आणि प्रशस्त स्टॉल्स  सज्ज आहेत.वैशिट्य - शॉपिंग उत्सव + आॅटो एक्स्पो + प्रॉपर्टी शो + फर्निचर अँड इंटेरिअर एक्स्पो + इलेक्ट्रो एक्स्पो

औरंगाबाद : अखेर सर्व जण ज्या महाप्रदर्शनाची आतुरतेने वाटत पाहत होते तो ‘लोकमत महाएक्स्पो’ आजपासून सुरू होत आहे. ‘लोकमत समूहा’तर्फे आयोजित या महाप्रदर्शनाचे एस. एफ. एस. मैदानावर गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून हे प्रदर्शन सुरु होणार आहे.  

प्रदर्शनात सीआयआयचे महाराष्ट्र अध्यक्ष ऋषी बागला, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक, के्रडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार, औरंगाबाद आॅटो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष मनीष धूत, आणि औरंगाबाद इलेक्ट्रॉनिक डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जाधव हे सहभागी होतील. २५ ते २९ जानेवारीदरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे महाप्रदर्शन सुरू राहील.

गृहोपयोगी वस्तू, गृह सजावट, वाहन, घरे-सदनिका आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असे पाच प्रकारच्या प्रदर्शन एकाच छताखाली आहे. संपूर्ण कुटुंबासोबत खरेदीची अभूतपूर्व संधी उपलब्ध करून दिली आहे. ४० हजार चौरस फूट जागेवर उभारलेल्या एकूण ३०० अद्ययावत आणि प्रशस्त स्टॉल्स  सज्ज आहेत.

महिलांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन ‘लोकमत शॉपिंग उत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत आॅटोएक्स्पो’मध्ये फोर्स, होल्ड बाय नेक्सा, जीप, टाटा, महिंद्रा, अशोक लेलँड, वॅकंट, बाईक स्टुडिओ, होंडा यांसह अनेक टॉप ब्रँडस्ची वाहने येथे असणार आहेत.
‘लोकमत इलेक्ट्रोएक्स्पो’मध्ये हर एक प्रकारच्या ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, फ्रीज यांची वैविध्यपूर्ण रेंज आहे. ‘लोकमत फर्निचर अँड इंटेरिअर एक्स्पो’मध्ये गृहसजावटीच्या  आकर्षक  वस्तू मिळतील. 

औरंगाबादमध्ये घर घेण्याचे स्वप्न करायचे असेल, तर तुम्ही ‘लोकमत प्रॉपर्टी शो’मध्ये यायलाच हवे. प्राईड ग्रुप, पाल्मस् रिअ‍ॅलिटी, आर्च डेव्हलपर्स, प्रीत ग्रुप/वंश गु्रप, युनिक डेव्हलपर्स, विकास डेव्हलपर्स, नागपाल गु्रप, जय डेव्हलपर्स, मराठवाडा कन्स्ट्रक्शन्स, अप्रतिम बिल्डर्स, कोणार्क बिल्डर्स, श्री श्री बालाजी, दिशा गु्रप, ओशियन रिअल्टर्स इंडिया प्रा. लि. राठी कन्स्ट्रक्शन्स असे नामांकित बिल्डर्स सहभागी आहेत. 

प्रजासत्ताक दिन, शनिवार आणि रविवार अशा मस्त सुटीच्या ‘वीकएन्ड’ला या प्रदर्शनाला प्रत्येकाने एकदा तरी अवश्य भेट द्यावी. शॉपिंग उत्सवचे इव्हेंट पार्टनर कन्सेप्ट अ‍ॅडव्हर्टायझर असून अभिषेक अ‍ॅडव्हर्टायझर हे आउटडोअर पार्टनर आहेत. 

लोकमत महाएक्स्पो : २५ ते २९ जानेवारी
वैशिट्य - शॉपिंग उत्सव + आॅटो एक्स्पो + प्रॉपर्टी शो + फर्निचर अँड इंटेरिअर एक्स्पो + इलेक्ट्रो एक्स्पो
वेळ - सकाळी ११ ते रात्री ९ 
ठिकाण - एस. एफ. एस. मैदान, जालना रोड

Web Title: shopping Dhoom starts at 'Lokmat MahaXpo' Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.