महिला कर्मचाऱ्याने ब्लॅकमेल केल्याने दुकानदाराची आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 01:41 PM2019-05-06T13:41:29+5:302019-05-06T13:43:58+5:30

दुकानदाराने पैसे नसल्याचे सांगताच तरुणीने बदनामीची धमकी दिली.

Shopkeeper suicides due to blackmail by female employee; case filed Against Five | महिला कर्मचाऱ्याने ब्लॅकमेल केल्याने दुकानदाराची आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

महिला कर्मचाऱ्याने ब्लॅकमेल केल्याने दुकानदाराची आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

औरंगाबाद : एप्रिल महिन्यात विष घेऊन आत्महत्या केलेल्या कापड दुकानदाराच्या मृत्यूप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. आरोपी कुटुंबाने अनैतिक संबंधाची व्हिडिओ क्लीप बनवून ब्लॅकमेल करून पैसे उकळले आणि बदनामीची धमकी दिल्याने माझ्या पतीने आत्महत्या केल्याचे पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

कृष्णा केशवराव जोशी (५०, रा. न्यू हनुमाननगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मृताची पत्नी अर्चना जोशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ७ एप्रिलला रात्री कृष्णा हे दुकान बंद करून घरी आले तेव्हा ते तणावात होते. विचारणा केल्यानंतर त्यांनी मला सांगितले की, २०१३ मध्ये त्यांनी घर विक्री करून पद्मावती कापड दुकान सुरू केले होते. गिरामच्या मध्यस्थीने दुकानाचा गाळा त्यांनी भाड्याने घेतला होता. यामुळे गिराम आणि जोशी यांचे घरगुती संबंध निर्माण झाले. या दुकानातच लेडीज गारमेंट विभागात गिरामची नातलग तरुणी कामाला होती.

माल खरेदी करण्यासाठी गिराम आणि जोशी सुरत येथे सोबत जात. एकदा जोशी यांच्यासोबत दुकानात काम करणाऱ्या तरुणीच्या आईला पाठविले गेले. त्यातून पुढे जोशी आणि त्या महिलेमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. एवढेच नव्हे तर दुकानात काम करणाऱ्या तरुणीसोबतही जोशी यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. दोघी माय-लेकींनी नक ळत जोशी व त्यांच्यातील संबंधाचे व्हिडिओ  बनविले. त्या दोघी जोशी यांना ब्लॅकमेल करीत . ७ एप्रिल रोजी तरुणी दुकानात आली आणि तिने जोशींना पैसे मागितले. पैसे नसल्याचे  सांगताच तिने बदनामीची धमकी दिली. त्या रात्री जोशी यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. 

Web Title: Shopkeeper suicides due to blackmail by female employee; case filed Against Five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.