धुपखेडा येथे साईभक्तांची मांदियाळी

By Admin | Published: July 11, 2017 12:17 AM2017-07-11T00:17:30+5:302017-07-11T00:24:18+5:30

बिडकीन : साईबाबांची प्रकटभूमी श्रीक्षेत्र धुपखेडा येथील श्री साईबाबा सेवा साधनाश्रम व साई विश्वस्त ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमा उत्सवसाजरा करण्यात आला

Saiphakta's parents at Dhupkheda | धुपखेडा येथे साईभक्तांची मांदियाळी

धुपखेडा येथे साईभक्तांची मांदियाळी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बिडकीन : साईबाबांची प्रकटभूमी श्रीक्षेत्र धुपखेडा येथील श्री साईबाबा सेवा साधनाश्रम व साई विश्वस्त ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव देशभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
साईभक्त तथा प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव व साईभक्तांच्या सौजन्याने स्वामी बलदेव भारती यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबांचे प्रथम भक्त चांद पटेल यांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करुन लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी सहकाररत्न अंबादासराव पाटील मानकापे, सुनील इंगळे पाटील, संजय टेलर दौंडे, नरेंद्र नाशेरकर, चाँद पटेल यांचे वंशज चाँद बालम पठाण, बाबुलाल पठाण, ह.भ.प.एकनाथ महाराज राजूरकर, पांडुरंग तात्या वाघचौरे, मोहनराव वाघचौरे, सुनील भागवत, ज्ञानेश्वर भुकेले, नितीन मड्डमवार, सुनील वाघचौरे, अशोक कमल पाल, बबनराव ठाणगे, ज्ञानेश्वर औटी, चेअरमन श्रीरंग पा.वाघचौरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
४ जुलैपासून श्री गुरुचरित्राचे सामूहिक पारायण वे.शा.सं. शुभम देवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रविवारी सकाळी श्रींचे मंगलस्नान, अभिषेक, आरती, श्री गणेश याग, तसेच सकाळी दहा वाजता साईस्वरांजली या साईभक्ती गिताचा कार्यक्रम साईशाहीर ह.भ.प. सुनील महाराज वाघचौरे यांनी सादर केला. साईरुद्रा मिशनचे नरेंद्र नाशेरकर यांनी संगीतमय साईकथा व गुरुचे महत्त्व सांगितले.दिन्नापूर येथील श्रद्धा खणसे या गुणवंत विद्यार्थिनीचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वामी बलदेव भारती यांचे भक्तांनी पूजन केले. आरती व महाप्रसादाचे यजमान शिवानंद सोड्डी व गुरुनाथ बिरादार यांनी महाप्रसाद वाटप केला.
याप्रसंगी अशोक कमलपाल, संतोष खणसे, कृष्णराव जोशी, श्रीधर देवढे, केशवराव खणसे, सुदाम चव्हाण, प्रकाश मुळे, रामनाथ कराळे, दादासाहेब खणसे, शिवाजी गव्हाणे, कांताभैय्या, बंडू पा.कागदे, भीमराज टेके, विष्णूपंत साटोटे, मंगला पवार, अशोक सुब्रह्मण्यम फरिदाबाद, श्रीनिवासन, सद्धेश्वर भालेकर, राजू गायकवाड, दिनेश गायकवाड , विजय खराडकर, लक्ष्मण देवा बोरुडे, जगदाळे आदींसह हजारो साईभक्तांनी परिश्रम घेतले. तसेच साईबाबा विश्वस्त ट्रस्टच्या वतीने ह.भ.प. एकनाथ महाराज राजूरकर व ह.भ.प. गणपत महाराज यांचे प्रवचन व पूजनाचा कार्यक्रम होऊन रामराव पा.मुळे यांच्या वतीने भारत मुळे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

Web Title: Saiphakta's parents at Dhupkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.