बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:41 AM2018-08-25T00:41:32+5:302018-08-25T00:41:51+5:30

फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलै-आॅगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.२४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत औरंगाबाद विभागाचा निकाल २८.५० टक्के एवढा लागला आहे.

Result of 12th standard examination | बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलै-आॅगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.२४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत औरंगाबाद विभागाचा निकाल २८.५० टक्के एवढा लागला आहे.
पुरवणी परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ८ हजार ४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ८ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी केवळ २ हजार २८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी २८.५० टक्के एवढी आहे. राज्यातील सर्व विभागात १ लाख २ हजार १६० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात २३ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याची टक्केवारी २२.६५ एवढी आहे. राज्यात लातूर विभागात सर्वांधिक ३१.४७ टक्के विद्यार्थी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यानंतर औरंगाबाद विभागातील उत्तीर्णतेची टक्केवारी दुसऱ्या स्थानी आहे. पुरवणी परीक्षेत सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागात १९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
२१ केंद्रांवर झाली परीक्षा
बारावी पुरवणी परीक्षा औरंगाबाद विभागात २१ केंद्रांवर घेण्यात आली. यासाठी १८ परीक्षक, २१ केंद्र संचालक, ३३० पर्यवेक्षक, १ मुख्य नियामक, ९२ नियामक आणि १७९ परीक्षक कार्यरत होते. परीक्षा केंद्रांवर ५ आणि परीक्षोत्तर २, असे एकूण ७ गैरप्रकार उघडकीस आले. यासंबंधी चौकशी सुुरू आहे.

Web Title: Result of 12th standard examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.