रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता पाहून डीआरएम भडकल्या; सफाईसाठी संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम

By संतोष हिरेमठ | Published: May 5, 2023 12:14 PM2023-05-05T12:14:24+5:302023-05-05T12:15:14+5:30

'डीआरएम' नीती सरकार यांच्या अचानकपणे झालेल्या दौऱ्याने रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

Railways' DRMs fumed after seeing unsanitary conditions; An ultimatum by evening to clean up | रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता पाहून डीआरएम भडकल्या; सफाईसाठी संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम

रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता पाहून डीआरएम भडकल्या; सफाईसाठी संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशनवर जागोजागी अस्वच्छता, दुरवस्था पाहून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार या चांगल्याच भडकल्या. सायंकाळपर्यंत साफसफाई करून दुरवस्था दूर करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

'डीआरएम'पदी रुजू झाल्यानंतर नीती सरकार यांनी पहिल्यांदाच गुरुवारी  छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर पाहणी केली. त्यांच्या या अचानकपणे झालेल्या दौऱ्याने रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. स्टेशन बिल्डिंग, सरकरता जिना, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कँटीन, प्रतीक्षालय, मालधक्का आदींची पाहणी केली.

Web Title: Railways' DRMs fumed after seeing unsanitary conditions; An ultimatum by evening to clean up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.