शेंगदाणा-साबुदाणा वधारला!

By Admin | Published: July 31, 2014 12:02 AM2014-07-31T00:02:14+5:302014-07-31T00:46:32+5:30

संजय लव्हाडे, जालना पावसाच्या गैरहजेरीमुळे धान्य व किराणा मालाची आवक म्हणावी तशी नाही. सराफा बाजारातही शांतता आहे. दरम्यान, श्रावणमासामुळे साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव वधारले आहेत.

Peanuts-Sabudana rose! | शेंगदाणा-साबुदाणा वधारला!

शेंगदाणा-साबुदाणा वधारला!

googlenewsNext

संजय लव्हाडे, जालना
पावसाच्या गैरहजेरीमुळे धान्य व किराणा मालाची आवक म्हणावी तशी नाही. सराफा बाजारातही शांतता आहे. दरम्यान, श्रावणमासामुळे साबुदाणा, शेंगदाण्याचे भाव वधारले आहेत.
रमजान ईद निमित्त सुकामेवा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उठाव दिसून आला. पेंडखजूरचे भाव ६० ते ५०० रुपये प्रतिकिलो, चारोळी ७०० ते ८५० रुपये प्रतिकिलो, खोबरा १५० ते १७५ रुपये प्रतिकिलो, काजू ४०० ते ८०० रुपये किलो, किसमिस १७० ते ३०० रुपये प्रतिकिलो होते.
रेडिमेड कपडे, चप्पल-बूट, सुवासिक अत्तर, क्रॉकरी, ज्वेलरी तसेच फॅन्सी वस्तूंनी बाजारातत बऱ्यापैकी उलाढाल झाल्याचे चित्र आहे.
धान्य बाजारातील आवक दिवसेंदिवस खालावत आहे. गव्हाची आवक दररोज ५० पोते इतकी असून ५० रुपयांची मंदी आल्यानंतर भाव १५०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज १०० पोते इतकी असून शंभर रुपयांची मंदी आल्यानंतर भाव १४०० ते ३१०० रुपये असे आहेत.
सोयाबीनची आवक ५० पोती इतकी असून ५० रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर भाव ३९०० ते ३९५० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. हरभऱ्याची आवक दररोज ५० पोती इतकी असून भाव २३०० ते २७०० रुपये असे आहेत. तुरीची आवक ५० पोती इतकी असून भाव ३९०० ते ४६०० रुपये असे आहेत.
साबुदाणा व शेंगदाण्याच्या दरात ५०० रुपयांची तेजी आली. उत्पादन कमी आणि श्रावण महिना यामुळे ही तेजी आली. शेंगदाणा ५५०० ते ६५०० आणि साबुदाणा ६५० ते ७५०० असे भाव आहेत. सर्व प्रकारच्या डाळींचे भाव स्थिर आहेत.

Web Title: Peanuts-Sabudana rose!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.