सातबारा मिळत नसल्याने सोयगाव येथे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:28 AM2018-07-12T00:28:07+5:302018-07-12T00:28:35+5:30

ध्वजस्तंभावर ठिय्या : महिनाभरापासून शेतकरी त्रस्त

Movement in Soygaon due to lack of revenue | सातबारा मिळत नसल्याने सोयगाव येथे आंदोलन

सातबारा मिळत नसल्याने सोयगाव येथे आंदोलन

googlenewsNext

सोयगाव : सोयगावसह तालुकाभर महिनाभरापासून शेतकऱ्यांना सातबारा उतारे मिळत नसल्याने चकरा मारून वैतागलेल्या शेतकºयांनी सातबारे मिळण्यासाठी शासनाचा व सर्व्हर कंपनीचा निषेध करत बुधवारी ध्वजाच्या स्तंभावर बसून तासभर आंदोलन केले. आॅनलाईन आणि डिजीटल सातबाºयाच्या जाचातून मुक्त करून स्वातंत्र्य देण्याची नवीन मागणीही शेतकºयांनी केली.
सर्व्हर बंदअभावी तालुक्यात महिनाभरापासून शेतीचे उतारे मिळत नसल्याने सध्या शेतकºयांना बँकेचे पीककर्ज, पीकविमा भरण्यासाठी अडचण येत आहे. तालुक्यातील शेतकरी दररोज तहसील कार्यालयात चकरा मारून कंटाळले होते. त्यामुळे बुधवारी वैतागलेल्या शेतकºयांनी ध्वजाच्या स्तंभावर बसून अभिनव आंदोलन केले. स्वातंत्र्यदिनाच्या आधी या डिजीटल व आॅनलाईनच्या जाचातून स्वातंत्र्य देण्याची अनोेखी मागणी निवेदनाद्वारे यावेळी शेतकºयांनी केली. नवीन संकेतस्थळाच्या प्रशिक्षणानंतर सातबारे मिळण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन तासाभरात माघारी घेण्यात आले.
नवीन संकेतस्थळाच्या प्रशिक्षणासाठी कर्मचारी रवाना
डिजिटल सातबारे मिळण्याचे संकेतस्थळ महिनाभरापासून सुरु होत नसल्याने महसूल प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंगळवारी रात्रीच नवीन संकेतस्थळाच्या प्रशिक्षणासाठी येण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. बंद पडलेले पोर्टल सुरु न होण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाला मिळाल्याने सोयगाव तालुक्यासाठी नवीन संकेतस्थळ तयार करण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालय सातबारे देण्याचा प्रयोग आखत असल्याने सोयगाव तहसील कार्यालयाचे पाच महसूल कर्मचारी तातडीने प्रशिक्षणासाठी औरंगाबादला रवाना झाले आहेत.

Web Title: Movement in Soygaon due to lack of revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.