मध्यरात्रीचा थरार! लूटमार करणाऱ्या चोरट्यांना पकडताना दाेन किलोमीटर धावले पोलिस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 07:07 PM2023-02-25T19:07:12+5:302023-02-25T19:07:50+5:30

वैजापुरात मध्यरात्रीचा थरार; दोघांना अटक, दोघे फरार

Midnight thrill! The police ran for two kilometers while catching the looting thieves | मध्यरात्रीचा थरार! लूटमार करणाऱ्या चोरट्यांना पकडताना दाेन किलोमीटर धावले पोलिस

मध्यरात्रीचा थरार! लूटमार करणाऱ्या चोरट्यांना पकडताना दाेन किलोमीटर धावले पोलिस

googlenewsNext

वैजापूर : दुचाकीस्वारांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी काही तासांत छडा लावला असून दोघांना शुक्रवारी मध्यरात्री दाेन वाजता दाेन किलोमीटर पाठलाग करून पुरणगाव रोड परिसरातील शेतातून जेरबंद केले आहे. अन्य दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. सौरभ उर्फ बाबू विकी रुझासिओ (वय १९ वर्षे, रा. ईनामवाडी, शिर्डी ता. जि. अहमदनगर) व कृष्णा प्रकाश भोळे (वय २४ वर्षे, रा. आंबेडकरनगर, सिन्नर, जि. नाशिक) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वैजापूर तालुक्यातील तिडी येथील ज्ञानेश्वर सुभाष डुकरे व त्यांचे साडू अनिल शेळके हे परसोडा येथे लग्न समारंभ आटोपल्यावर शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नींसह दोन वेगवेगळ्या दुचाकींवर घरी परतत होते. शिवराई शिवारात एका जीपच्या (एमएच २३ एडी १२१६) चालकाने त्याची जीप त्यांच्या दुचाकींच्या समोर आडवी लावली. त्यानंतर चार जणांनी त्यांना लोखंडी राॅडने व चाकूने मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम, मोबाइल व महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने असा एकूण ९० हजार ३०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. त्यानंतर डुकरे यांनी ११२ क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया यांनी तत्काळ स्वत: वायरलेसद्वारे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. तसेच वैजापूर उपविभागातील सर्व पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांची पथके तयार करून त्यांना संशयित वाहनाला पकडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तीन पथके तयार करण्यात आली.

दरम्यान, ही कारवाई पोलिस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवर, उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, फौजदार मनोज पाटील, रज्जाक शेख, सहायक फौजदार महादेव निकाळजे, विठ्ठल जाधव, पोलिस अमलदार योगेश झाल्टे, भगवान सिंघल, प्रशांत गिते, विजय भोटकर, वाल्मीक बनगे, गोरक्ष सदगीर, नवनाथ केरे, नवनाथ निकम, ज्ञानेश्वर पाडळे, गणेश पैठणकर, सिमा जाधव, तीन होमगार्ड यांच्या पथकाने केली.

नाकाबंदीसाठी लावलेले बॅरिकेड्स तोडून चोरटे निघाले भरधाव
यावेळी संशयित वाहनाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नाकाबंदीसाठी लावलेले बॅरिकेड्स तोडून भरधाव वेगाने येवला रोड रोडच्या दिशेने सुसाट वेगाने निघाले. वैजापूर पोलिसाच्या सर्व पथकांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. हा थरार रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सुरू होता. पोलीस मागावर असल्याचे बघून आरोपींनी त्यांचे वाहन पुरणगाव रोडवर नेऊन एका शेतीच्या कडेला लॉक करून उभे केले. त्यानंतर अंधारात शेताच्या दिशेने चोरटे पळत सुटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. पोलिसांनी अंधारात शेतामध्ये दोन किलोमीटरपर्यंत पळत जाऊन दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. अन्य दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून दोन लोखंडी रॉड, जीप पोलिसांनी जप्त केली आहे.

Web Title: Midnight thrill! The police ran for two kilometers while catching the looting thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.