एमआयडीसी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:30 PM2019-03-15T23:30:37+5:302019-03-15T23:30:51+5:30

एमआयडीसी प्रशासनाने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून हाती घेतले आहे.

 The MIDC water works are underway | एमआयडीसी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु

एमआयडीसी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु

googlenewsNext

वाळूज महानगर : एमआयडीसी प्रशासनाने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून हाती घेतले आहे. त्यामुळे चिकलठाणा, शेंद्रासह जालना एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.


वाळूज एमआयडीसीसह नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीने जायकवाडी येथून बजाजगेट जवळील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाल्मी रस्त्यावर मोठी जलवाहिनी टाकली आहे. येथील जलशुद्धीकरण केंद्रातून चिकलठाणा, शेंद्रा व जालना औद्योगिक क्षेत्राला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या मुख्य जलवाहिनीला काही दिवसांपासून गळती लागली आहे. गळतीमुळे पाणी खाली वाहून जात असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.

अनेकवेळा दुरुस्ती करुनही गळती थांबत नसल्याने एमआयडीसीने जलवाहिनी दुरुस्तीचा निर्णय घेतला. याबाबत उद्योजकांना माहिती देवून एमआयडीसीने शुक्रवारी बजाज गेट-पाटोदा-वाल्मी रस्त्यावरील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. दुरुस्ती दरम्यान खराब झालेला संपूर्ण पाईप बदलून त्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात येत असून गळतीच्या ठिकाणी वेल्डिंग करुन दुुरुस्ती केली जात आहे. एमआयडीसीचे व्ही.ए. बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दिवसभर दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे चिकलठाणा, शेंद्रा व जालना एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. हे काम रात्री उशिरापर्यंत चालणार असून शनिवारी (दि.१६) सुरळित पाणीपुरवठा सुरु होईल असे बनसोडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title:  The MIDC water works are underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.