एमजीएम, बँकर्स, महावितरण संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:43 PM2018-03-29T23:43:33+5:302018-03-30T11:10:56+5:30

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत एमजीएम, कम्बाइंड बँकर्स व महावितरण अ संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. गुरुवारी झालेल्या सामन्यात सय्यद फरहान, दीपक पाटील व राहुल शर्मा सामनावीर ठरले.

MGM, bankers, MSEDCL won | एमजीएम, बँकर्स, महावितरण संघ विजयी

एमजीएम, बँकर्स, महावितरण संघ विजयी

googlenewsNext
ठळक मुद्देऔद्योगिक क्रिकेट स्पर्धा : सय्यद फरहान, दीपक पाटील, राहुल शर्मा सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत एमजीएम, कम्बाइंड बँकर्स व महावितरण अ संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. गुरुवारी झालेल्या सामन्यात सय्यद फरहान, दीपक पाटील व राहुल शर्मा सामनावीर ठरले.
पहिल्या सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी ड संघाविरुद्ध एमजीएम ब संघाने प्रथम फलंदाजी करीत २0 षटकांत ४ बाद १५७ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून सय्यद फरहान याने ३५ चेंडूंतच ६ चौकार व एका षटकारासह ५0 धावा केल्या. शेखर ताठेने २ चौकार, २ षटकांरासह ४५, प्रमोद राऊतने ११ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह १९ धावा केल्या. वैद्यकीय प्रतिनिधी ड संघाकडून सिराज काझी व वसीम शेख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात वैद्यकीय प्रतिनिधी ड संघ ८ बाद १५१ धावा करू शकला. त्यांच्याकडून वसीम शेखने ५३ चेंडूंत ४ षटकार व ५ चौकारांसह ६८, मोईज शेखने ४१ धावा केल्या. एमजीएमकडून प्रमोद राऊतने २४ धावांत ३, तर रवींद्र काळे व आनंद बर्फे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात कम्बाइंड बँकर्सने १९ षटकांत सर्वबाद १२२ धावा केल्या. त्यांच्याकडून अमेय अंकुलेने ३0, निखिल मुरुमकरने १७ व दीपक पाटीलने १६ धावा केल्या. मध्यवर्ती कार्यशाळा संघाकडून शिवाजी नवगिरे व रोहिदास गुंजल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मध्यवर्ती कार्यशाळा ७२ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून विशाल मुकुटमलने ४ चौकारांसह २0, महेश वैद्यने २१ धावा केल्या. बँकर्सकडून दीपक पाटीलने ९ धावांत ४ गडी बाद केले. अमेय उंकुले व अशोक पोटलवाड यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
तिसºया सामन्यात महावितरण अ संघाने २0 षटकांत २ बाद २0६ धावांचा डोंगर रचला. त्यांच्याकडून राहुल शर्माने ५९ चेंडूंत ३ षटकार व ९ चौकारांसह ९0 धावा केल्या. इनायत अलीने ६ चौकारंसह ३७, स्वप्नील चव्हाणने २८ चेंडूंत ३ षटकार व ५ चौकारांसह ५२ धावा केल्या. राहुल शर्मा व स्वप्नील चव्हाण यांनी दुसºया गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी केली. जिल्हा वकील अ संघाकडून दिनकर काळे व कीर्तिकुमार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जिल्हा वकील संघ ५ बाद ११0 पर्यंत मजल मारू शकला. त्याच्याकडून मोहित घाणेकरने १८ व शमी खानने १४ धावा केल्या. महावितरणकडून इनायत अलीने २, तर राहुल परदेशी, योगेश मागसरी व सचिन पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आज झालेल्या सामन्यात पंच म्हणून आर. नेहरी, उदय बक्षी, सय्यद जमशीद, बाळासाहेब वाघमारे यांनी काम पाहिले. गुणलेखन तन्मय ढगेने केले.
उद्या, शुक्रवारी सकाळी ७.३0 वाजता एमजीएम अ वि. शहर पोलीस ब, ११ वा. उच्च न्यायालय वकील वि. वैद्यकीय प्रतिनिधी ई व दुपारी २ वाजता कम्बाइंड बँकर्स अ वि. महावितरण ब यांच्यात सामने खेळवले जाणार आहेत.

Web Title: MGM, bankers, MSEDCL won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.