Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी पायी मुंबईला गेलेल्या मात्रे यांची कोपर्डीतील पीडीत मुलीच्या वडिलांनी घेतली भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:19 PM2018-09-15T15:19:09+5:302018-09-15T15:21:36+5:30

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी औरंगाबाद ते मंबई पायी जाऊन मख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या बाळापूर (ता. औरंगाबाद) येथील काकासाहेब मात्रे यांचा आज कोपर्डी घटनेतील पीडीत मुलीच्या वडिलांनी भेट घेऊन सत्कार केला. 

Maratha Reservation: Due to the demand for reservation, the father of Kopardi girl meets activist Matre who went munbai by walk | Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी पायी मुंबईला गेलेल्या मात्रे यांची कोपर्डीतील पीडीत मुलीच्या वडिलांनी घेतली भेट 

Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी पायी मुंबईला गेलेल्या मात्रे यांची कोपर्डीतील पीडीत मुलीच्या वडिलांनी घेतली भेट 

googlenewsNext

औरंगाबाद : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी औरंगाबाद ते मंबई पायी जाऊन मख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या बाळापूर (ता. औरंगाबाद) येथील काकासाहेब मात्रे यांचा आज कोपर्डी घटनेतील पीडीत मुलीच्या वडिलांनी भेट घेऊन सत्कार केला. 

बाळापूर येथील समाजिक सभाग्रहात आयोजित कार्यक्रमात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संजय सावंत, संतोष काळे, महेश डोंगरे, परमेश्वर नलावडे, दिलीप झगरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुभाष पवार, रामराव खाडे, भानुदास खाडे, विठ्ठल खाडे, मुख्याध्यापक तुपे, सुदाम तुपे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

यावेळी कोपर्डीतील पिडीत मुलीचे वडील म्हणाले, काकासाहेब यांनी बाळापूर ते मुंबई पायी प्रवास करून मुख्यमंत्र्यांयकडे मराठा आरक्षणासह इतर मागण्या सादर केल्या. विशेष म्हणजे यावेळी त्याने पायी जाताना मराठा बांधवांनी आत्महत्या करू नये, हा संदेश दिला. यामुळे बऱ्याच युवकांमध्ये शांततेत मागण्या सादर करण्याची उमेद निर्माण झाली आहे. यामुळे काकासाहेब हा युवक कौतुकास पात्र आहे. 

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक सावंत म्हणाले, बाळापूर येथील अत्यंत गरीब घरातील मराठा तरूणाने औरंगाबाद ते मुंबई पायी प्रवास करून मराठा आरक्षणासाठी इतर मागण्या करून मराठा तरूणांना आत्महत्यांपासून परावृत्त होण्याचा सल्ला दिला. यासाठी काकासाहेब या युवकाचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहेत. यावेळी काकासाहेब यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रवासादरम्यानचे अनुभव कथन केले. त्यांनी पुन्हा मराठा समाज बांधवांना आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या न करण्याचे आवाहन केले.  यावेळी चिखलठाणा पोलीस ठाण्याचे सपोनि. सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. सुधाकर चव्हाण, संपत राठोड, सचिन जाधव, विशाल लोंढे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Web Title: Maratha Reservation: Due to the demand for reservation, the father of Kopardi girl meets activist Matre who went munbai by walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.